भारतीय जैन संघटनेने सुरू केल्या पुन्हा कोरोना चाचण्या

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारतीय जैन संघटनेने सुरू केल्या पुन्हा कोरोना चाचण्या

मागील वर्षी कोरोना काळात शासकीय वैद्यकीय यंत्रणेवर कोरोना चाचण्याचा आलेला ताण कमी करण्यासाठी भारतीय जैन संघटनेने मोफत कोरोना चाचणी उपक्रम राबवला होता.

छत्रपती संभाजी महाराजांची जयंती निमगावात उत्साहात
विकासासाठी खा. डॉ. सुजय विखे यांच्यासोबत या : अ‍ॅड. आगरकर
कोरोना उपाययोजनांना पहिले प्राधान्य : नूतन महापौर रोहिणी शेंडगे यांनी घेतला पदभार

अहमदनगर/प्रतिनिधी- मागील वर्षी कोरोना काळात शासकीय वैद्यकीय यंत्रणेवर कोरोना चाचण्याचा आलेला ताण कमी करण्यासाठी भारतीय जैन संघटनेने मोफत कोरोना चाचणी उपक्रम राबवला होता. आता पुन्हा त्यांनी कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहून हा उपक्रम पुन्हा हाती घेतला आहे. बीजेएस व फोर्स मोटर्सद्वारे नगरमध्ये पुन्हा एकदा मिशन झिरो अहमदनगर अभियान सुरू करण्यात आले असून, यात मोफत रॅपिड अँटीजेन टेस्टची व्यवस्था केली गेली आहे. या उपक्रमाचे उदघाटन करताना करोनाचा फैलाव रोखण्यासाठी जास्तीत जास्त टेस्टिंग महत्वाच्या असल्याचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी स्पष्ट केले. 

राज्यासह नगरमध्येही करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. हा फैलाव रोखण्यासाठी जास्तीत जास्त टेस्टिंग व बाधित रुग्णांचे विलगीकरण आवश्यक आहे. भारतीय जैन संघटना, फोर्स मोटर्स, अहमदनगर महापालिकेने करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुन्हा एकदा मिशन झिरो अहमदनगर अभियान सुरू केले आहे. यात महापालिकेच्या केंद्रांवर मोफत रॅपिड अँटीजेन टेस्टची व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमातून रुग्णांचे निदान लवकर होऊन करोना लवकर नियंत्रणात येण्यास मदत होईल, असे प्रतिपादन महापौर वाकळे यांनी केले.

COMMENTS