Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कविता ही हृदयाची भाषा ती जगता आली पाहिजे ः कवी प्रकाश घोडके

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः कवी आणि कविता यांचं नातं अद्वैत स्वरूपाचे असते. कविता ही हृदयाची भाषा आहे, ती जशी बोलता येते, लिहिता येते, सादर करता येते,

बिनविरोधची भाषा फक्त तोंडीच…गुरुजी लढण्याच्या तयारीत
अल्पवयीन मुलीवर चारशे नराधमांकडून अत्याचाराचा आरोप | LOKNews24
जन्मदात्यानेच केला पोटच्या मुलीवर अत्याचार

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः कवी आणि कविता यांचं नातं अद्वैत स्वरूपाचे असते. कविता ही हृदयाची भाषा आहे, ती जशी बोलता येते, लिहिता येते, सादर करता येते, तशी ती  प्रत्यक्ष जगता आली पाहिजे, असे मत मराठीतील प्रख्यात कविवर्य प्रकाश घोडके यांनी व्यक्त केले. श्रीरामपूर येथील इंदिरानगरमधील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे कविवर्य प्रकाश घोडके यांचा साहित्यिक जीवनकार्याबद्दल सत्कार आणि कविसंमेलनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य, कवी बापूसाहेब पटारे होते. त्यांच्या हस्ते कविवर्य घोडके यांचा शाल, बुके, पुस्तके, भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी साहित्य चळवळ आणि वाचन संस्कृतीचा परिचय करून दिला. श्रीरामपूरमध्ये 1978पासून ’साहित्यनिर्मिती,  उपक्रम आणि जीवन’या संदर्भात प्रास्ताविक केले. कवयित्री संगीता फासाटे ह्यांनी कविवर्य प्रकाश घोडके यांचा परिचय करून दिला.प्रकाश प्रल्हाद घोडके ह मिरजगावसारख्या ग्रामीण भागातले असून ते सध्या पुणे येथे वास्तव्यास आहेत. ’तुझ्या दाराहून जाता ’(2002),  ’तळघर आणि कवडसे ’(2009)ह त्यांचे कवितासंग्रह अधिक लोकप्रिय ठरले आहेत.चित्रपटगीते, अभिनय,अनेक साहित्य संमेलन अध्यक्ष, मनाचे साहित्य पुरस्कार त्यांना लाभले आहेत. असे सांगून कविवर्य घोडके यांनी वाचन संस्कृती प्रतिष्ठानच्या कार्याचा परिचय करून घेतला,त्याबद्दल आनंद व्यक्त केला. माजी प्राचार्य डॉ. शन्करराव गागरे, सौ. मंदाकिनी उपाध्ये,गणेशानंद उपाध्ये यांनीही घोडके यांच्या कवितेच्या सादरीकरणाचा आस्वाद घेतला. डॉ. बाबुराव उपाध्ये, संगीता फासाटे, बापूसाहेब पटारे यांच्या कवितावाचनाचे प्रकाश घोडके यांनी कौतुक केले.महाराष्ट्रातील ग्रामीण भागात खूप दर्जेदार कवी, लेखक आहेत पण त्यांची प्रसारमाध्यमे दखल घेत नाहीत, अशी खंत कविवर्य घोडके यांनी व्यक्त केली.डॉ. बाबुराव उपाध्ये यांचे वाचनालय ह ग्रामीण वाचक आणि नवोदित संशोधकांना पर्वणी आहे असे सांगून उपक्रमाचे कौतुक केले. संगीता फासाटे यांनी सूत्रसंचालन केले. सौ. आरती उपाध्ये यांनी आभार मानले.

COMMENTS