Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बँकिंग क्षेत्राला 30,600 कोटींची नवसंजीवनी; केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटानंतर लागलेल्या टाळेबंदीमुळे अनेक बँका देखील मोठया अडचणीत आल्या असून, या बँकेला नवसंजीवनी देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री

Aurangabad : समृद्धी महामार्गाच्या कामाचे साहित्य चोरीला | LokNews24
‘कभी खुशी कभी गम’मधील छोट्या करीनाचे गोव्यामध्ये धुमधडाक्यात लग्न
नागपूर हादरलं! कारमध्ये गतिमंद मुलीवर ओला चालकाने केला अत्याचार

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटानंतर लागलेल्या टाळेबंदीमुळे अनेक बँका देखील मोठया अडचणीत आल्या असून, या बँकेला नवसंजीवनी देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकिग क्षेत्रासाठी 30,600 कोटींच्या तरतूदीची आर्थिक घोषणा केली आहे.


कोरोनामुळे काही बँकांना टाळे लागण्याची देखील वेळ ओढवली. त्यामुळे देशातील एकूण आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी आणि बँकिंग क्षेत्राला नवी उभारी देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये केंद्र सरकारने बँकिंग क्षेत्राला पाठबळ देण्यासाठी नॅशनल अ‍ॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामार्फत संकटात असलेल्या बँकिंग क्षेत्रासाठी तब्बल 30 हजार 600 कोटींच्या निधीची घोषणा करण्यात आली आहे. शुक्रवारी जीएसटी कौन्सिलची बैठक होणार असून या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. 2018 साली देशातल्या 21 सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांपैकी फक्त दोन बँका फायद्यामध्ये होत्या. उरलेल्या बँकांनी तोटा दाखवला होता. मात्र, 2020-21 या आर्थिक वर्षात देशातल्या 21 पैकी फक्त दोनच बँका तोट्यात असून उरलेल्या सर्व बँका फायद्यात आहेत. याचं एक कारण बँकांनी आपल्या स्तरावर देखील निधी जमा करायला सुरुवात केली आहे, असं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यावेळी म्हणाल्या.
दरम्यान, या घोषणेविषयी सविस्तर सांगताना निर्मला सीतारमण म्हणाल्या, येत्या पाच वर्षांसाठी या 30 हजार 600 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी नॅशनल अ‍ॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडची स्थापना करण्यात येईल. याद्वारे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया गॅरंटीची तरतूद करण्यात आली आहे. एनएआरसीएलकडून दिल्या जाणार्‍या सेक्युरिटी रिसीटसाठी ही गॅरंटी असेल. यंदाच्या अर्थसंकल्पात देखील असेट्री कन्स्ट्रक्शन कंपनी उभारण्याविषयी घोषणा करण्यात आली होती. देशातील बँकिंग क्षेत्राला सामना कराव्या लागणार्‍या समस्यांचा आम्ही आढावा घेतला.

COMMENTS