पुणे विभागातील 6 लाख 50 हजार 743 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे विभागातील 6 लाख 50 हजार 743 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

पुणे विभागातील 6 लाख 50 हजार 743 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 7 लाख 32 हजार 337 झाली आहे.

विद्यार्थ्यांसाठी युवासेना नेते पूर्वेश सरनाईक यांचा वंडर ठाणे उपक्रम 
 विजापूरहून आलेल्या रुग्णाचा कोरोनाने मृत्यू
दुर्दैवाने निकाल विरोधात आला तर देशभरातील ओबीसींना अडचणी – भुजबळ | LOKNews24

पुणे : पुणे विभागातील 6 लाख 50 हजार 743 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 7 लाख 32 हजार 337 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 64 हजार 527 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 17 हजार 67 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.33 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 88.86 टक्के आहे. पुणे जिल्हयातील कोरोना बाधित एकूण 5 लाख 6 हजार 347 रुग्णांपैकी 4 लाख 41 हजार 784 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.  

ॲक्टीव रुग्ण 54 हजार 855 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 708 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.92 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 87.25 टक्के आहे. सातारा जिल्हयातील कोरोना बाधित एकूण 64 हजार 108 रुग्णांपैकी 59 हजार 357 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 867 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 884 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधित एकूण 59 हजार 416 रुग्णांपैकी 53 हजार 15 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 476 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 925 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयातील कोरोना बाधित एकूण 50 हजार 753 रुग्णांपैकी 47 हजार 352 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 616 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 785 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधित एकूण 51 हजार 713 रुग्णांपैकी 49 हजार 235 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 713 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 765 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कालच्या रुग्ण संख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये 7 हजार 683 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 6 हजार 563, सातारा जिल्ह्यात 365, सोलापूर जिल्ह्यात 469, सांगली जिल्ह्यात 213 तर कोल्हापूर जिल्ह्यात 73 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे. कालच्या रुग्ण संख्येमध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 5 हजार 140 आहे. पुणे जिल्हयामध्ये 4 हजार 599, सातारा जिल्हयामध्ये 252, सोलापूर जिल्हयामध्ये 153, सांगली जिल्हयामध्ये 92 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 44 रुग्णांचा समावेश आहे. पुणे विभागातील सर्व्हेक्षण आजपर्यत विभागामध्ये एकुण 47 लाख 52 हजार 812 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालापैकी 7 लाख 32 हजार 337 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

COMMENTS