पवारांच्या पायाला दुखापत झाल्याने गाड्या रेस ट्रॅकवर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पवारांच्या पायाला दुखापत झाल्याने गाड्या रेस ट्रॅकवर

बालेवाडी क्रीडा संकुलाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अन्य नेत्यांचा ताफा थेट संकुलात गेल्यामुळे भाजपने टीकेची झोड उठविली होती.

अभिनेत्री अमिषा पटेल भलत्याच अडचणीत.
‘लॉली’ पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला.
किरीट सोमय्या हल्लात झाले रक्तबंबाळ | LOK News 24

पुणे/प्रतिनिधी : बालेवाडी क्रीडा संकुलाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अन्य नेत्यांचा ताफा थेट संकुलात गेल्यामुळे भाजपने टीकेची झोड उठविली होती. थेट केंद्रीय क्रीडा मंत्र्यांनी त्याची दखल घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या क्रीडा आयुक्तांना त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागले. क्रीडा आयुक्तांनी त्याबाबत दिलगिरी व्यक्त केली. 

पुण्यातील शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये अ‍ॅथलिट्सच्या रेस ट्रॅकवर व्हीव्हीआयपी गाड्या उभ्या करण्यावरून वादंग निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांची गाडी तिथे पार्क करण्यास परवानगी देण्यात आली होती, असे उत्तर क्रीडा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिले आहे. सिमेंट ट्रॅकवर गाड्या पार्क करण्याची परवानगी देण्याचे कारण म्हणजे पवार यांच्या पायाचा काहीतरी प्रॉब्लेम होता. त्यांना चालायला त्रास होऊ नये, म्हणून संमती देण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले. दुर्दैवाने गाड्या रेसिंग ट्रॅकवर उभ्या केल्या गेल्या. त्याबद्दल आपण माफी मागतो. अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, असे आश्‍वासनही बकोरिया यांनी दिले. धावपटूंसाठी तयार केलेल्या रेस ट्रॅकवर व्हीव्हीआयपी गाड्या उभ्या करण्यावरून टीकेची झोड उठली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रेस ट्रॅकवर गाड्या पार्क करून क्रीडा सुविधांचे नुकसान केले आहे, असा आरोप पुण्यातील भाजप नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांनी केला होता. या प्रकरणाचा तपास करण्याची मागणीही त्यांनी केली होती. 26 जूनला शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शरद पवारांसह काँग्रेस नेते आणि क्रीडा मंत्री सुनील केदार, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यासारखे नेते उपस्थित होते. या नेत्यांच्या गाड्या रेस ट्रॅकवर पार्क केल्यामुळे टीकेची झोड उठली होती.

COMMENTS