प्रदीप शर्मांना 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रदीप शर्मांना 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

चकमक फेम अशी ओळख असलेल्या वरिष्ठ पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

मराठी पत्रकार परिषद पत्रकारांसाठी एक कोटींचा निधी उभारणार- एस.एम.देशमुख
उशिरा सुचलेलं शहाणपण
अवकाळी चा फटका मिरची व्यापारांना, सुकवण्यासाठी टाकलेली मिरची पावसामुळे खराब

मुंबई/प्रतिनिधी: चकमक फेम अशी ओळख असलेल्या वरिष्ठ पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरन हत्या प्रकरणी शर्मा यांना 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्यासोबत संतोष शेलार, आनंद जाधवलाही 12 जुलैपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांआधी शर्मा यांची एनआयए कोठडीत रवानगी करण्यात आली होती. या अनुषंगाने शर्मा यांनी वकिलास भेटण्याची परवानगी मागितली असता त्यांना न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला होता; पण त्यांनतर आता न्यायालयाने 12 जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे. ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरन हत्या प्रकरणी शर्मा यांना अटक करण्यात आली. एनआयए कोर्टाने त्यांना 28 जूनपर्यंत कोठडी दिली होती. यामध्ये आज पुन्हा वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, वकिलास भेटण्याची परवानगी मिळावी म्हणून शर्मा यांनी एनआयए कोर्टात अर्ज सादर केला होता. यावर सुनावणी झाली असता कोर्टाने शर्मा यांना दिलासा दिला. शर्मा त्यांच्या वकिलांना दररोज दुपारी 12 ते 12.20 या वेळेत भेटू शकतात, असे परवानगी देताना कोर्टाने म्हटले आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटके ठेवण्यात आली होती. ही बाब उघड झाल्यानंतर हे प्रकरण नाट्यमय वळणे घेत आहे. त्यात स्कॉर्पिओ मालक मनसुख हिरनची हत्या झाल्यानंतर हे प्रकरण अधिकच गंभीर बनले. सचिन वाझे यांच्यासह गुन्हे शाखेतील त्यांच्या दोन सहकार्‍यांना अटक झाल्यानंतर तपासाची व्याप्ती वाढतच चालली आहे. 18 जून रोजी याप्रकरणी प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली. हिरन हत्येप्रकरणात शर्मा हे मास्टरमाइंड असल्याचा संशय एनआयएला असून ठोस पुरावे हाती लागल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

COMMENTS