पक्वानांच्या ताटात पालीची लघुशंका!

Homeताज्या बातम्यासंपादकीय

पक्वानांच्या ताटात पालीची लघुशंका!

भरल्या घरात सांजवेळी रडणे भारतीय संस्कृतीत अशुभ मानले जाते,ही वेळ लक्ष्मीच्या आगमनाची.अशा वेळी झाडलोटही करू नये हा आपला पुर्वापार संकेत.विशेषतः मंगलक

बंडाच्या स्वल्पविरामाला अंकूर फुटेल?
समृध्द ‘ महाराष्ट्राचे निर्माणकर्ते!
अर्बन बँक घोटाळा आणखी किती बळी घेणार?

भरल्या घरात सांजवेळी रडणे भारतीय संस्कृतीत अशुभ मानले जाते,ही वेळ लक्ष्मीच्या आगमनाची.अशा वेळी झाडलोटही करू नये हा आपला पुर्वापार संकेत.विशेषतः मंगलकार्याप्रसंगी तर अशा अशुभ गोष्टी करणे आपल्या संस्कृतीत कर्म दारिद्र्याचे लक्षण मानले जाते.पाच पक्वानांनी भरलेल्या ताटात अनपेक्षीतपणे पालीने लघूशंका करणाऱ्या अशुभ संकेता एव्हढा द्वाडपणा राज्यकर्तेच करू लागले तर आपली धर्म संस्कृती कुणी टिकवायची? ज्यांनी धर्म रक्षणाचा ठेका छाती बडवून बडवून स्वतःकडेच ठेवला अशा हिंदूत्ववाद्यांना तरी हे वर्तन शोभत नाही.
आपल्या घरात एखादे मंगल कार्य सजले आहे.सर्वदूर पै पाहुण्यांची वर्दळ सुरू आहे.पाहुण्यांच्या सरबराईत कुटूंब कबिला व्यस्त आहे.घरदार मंगल तोरणांनी सजले आहे.दारी मांडव पडला आहे.अशा मंगलमय वातावरणात एखादी व्यक्ती अनपेक्षीतपणे भोकाड पसरून विव्हळू लागली तर,एखाद्या श्वानाचे रूदन कानावर पडले तर,किंवा पाहुण्यांसाठी पाच पक्वान्न वाढलेल्या ताटात पालीने लघुशंकेचे तिर्थ सोडले तर..कोण हाहाकार माजेल.भरल्या मांडवात जाणते किंवा अजाणतेपणाने केलेला हा द्वाड पणा खपवून घेतला जाणार नाही.आपल्या संस्कृतीत ही सारी लक्षणे अशुभ घटनांचे द्योतक मानण्याची प्रथा आहे.हे माहीत असूनही देशाच्या पंतप्रधान पदाची जबाबदारी खांद्यावर असलेल्या शहाण्या व्यक्तीमत्वाने कळतनकळत असा द्वाडपणा केला तर? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जाणतेपणी म्हणा किंवा अजणतेपणाने म्हणा,असे वर्तन घडले आहे,सारा देश स्वातंत्र्यांचा ७४ वा वर्धापन दिन साजरा करण्याची जय्यत तयारी करीत असताना पुर्वसंध्येलाच असा द्वाडपणा झाला.भारताला १५ आॕगस्ट १९४७ रोजी इंग्रजांनी स्वातंत्र्य बहाल केले पण या अखंड महाकाय देशाचे दोन तुकडे करणारी फाळणी आपल्यावर लादली.तो दिवस १४ आॕगस्टचा.या वेदना प्रत्येक भारतीयाच्या मनात काटा रूतावा अश्या रूतून असल्या तरी त्या वेदनांचे स्मरण करून स्वातंत्र्योत्सवाला अपशकून करण्याचा द्वाडपणा कुठलाच भारतीय करीत नाही,मग पंतप्रधांनांना ही दुर्बुध्दी का सुचावी? हा खरा कळीचा मुद्दा आहे.
 फाळणीच्या वेदना कितीही भयानक असल्या तरी त्याची वारंवार आठवण काढून स्मृतीदिवस साजरा
करण्याची गरज आहे का? या प्रश्नाचे उत्तर नाही असेच आहे,खरेतर स्वातंंत्र्य दिनाच्या  पूर्वसंध्येला राष्ट्रपती देशाला संबोधित करण्याची परंपरा आहे,मात्र अनेक परंपरांप्रमाणे  यावेळी प्रधानमंत्री नरेंन्द्र मोदी यांनी या परंपरेलाही छेद देऊन देशाला संबोधीत करतांना स्वातंत्र्य दिनाची  पूर्वसंध्या म्हणजे १४ ऑगस्ट हा दिवस यापुढे “फाळणी वेदना स्मृतीदिन” साजरा केला जाईल अशी घोषणा केली. पंतप्राधानांची ही घोषणा केवळ घोषणा नाही तर या भुमिकेला अनेक कंगोरे आहेत.म्हणूनच या घोषणेवर देशभरातून चर्चेला उधाण येणे स्वाभाविक आहे.परिवर्तन हा निसर्गाचा अपरिहार्य नियम आहे.तसेच विस्मरण ही  देखील निसर्गाने मानवाला दिलेली एका वेगळ्या अर्थाने देणगी आहे.विस्मरणामुळे अनेक अप्रिय गोष्टी आपल्या नजरेआड जातात,त्यातून होणाऱ्या वेदनांची तिव्रता कमी होत जाते.मानवी जीवनात सामाजिक, राजकीय क्षेत्रात अनेक घटनाक्रम सातत्याने होत असतात. देशाच्या इतिहासात देखील अनेक घटनाक्रमांची नोंद होते. घटनाक्रमांना प्रसंगानुरूप न्याय मिळत जातो, संघर्ष केला जातो, उत्तर दिले जाते. परंतू तो प्रसंग तत्कालिन परिस्थितीत कोणकोणते संदर्भ घेवून आलेला असतो, त्यानुसार व्यक्ती किंवा राज्यकर्ते, राज्याचे किंवा देशाचे प्रमुख त्यावर निर्णय घेवून तो विषय मार्गी लावत असतात. आणि समोर आलेल्या नव्या प्रश्नांना नव्या आव्हानांना उत्तर देण्यासाठी सज्ज असतात. इतिहास अशा अनेक घटनेचा साक्षीदार असतो. सुख, दुखः, आनंद, हास्य, वेदना या मानवी संवेदना असतात, त्या संवेदनांच्या अनुभूतीनुरूप हसतो, रडतो, आनंदीत होतो, दुःखी होतो. पुन्हा जीवनातील दैनंदिन जीवनात व्यस्त होतो. जुन्या आठवणी वेदना देणार्‍या असतील, मनाला दुखीः करणार्‍या असतील तर त्यांचे स्मरण करू नये. आठवणी आनंद देणार्‍या असतील, त्यातून प्रेरणा, उत्साह, आनंद मिळणार असेल त्याचे स्मरण करावे. या भारतीय अध्यात्माच्या आधारावर भारताच्या फाळणीचा वेदनादायी इतिहास पुन्हा चघळायचा म्हणजे मनात द्वेषाची, बदला घेण्याची भावना प्रज्वलित करण्यासारखे आहे. भारताची फाळणी हा तत्कालिन परिस्थितीत झालेला निर्णय होता. जो देशप्रेमी लोकांना आवडला नाही. परंतू अखंड भारतासाठी गांधीजींनी मोहम्मद अली जिन्ना यांना पंतप्रधान होण्याची सुद्धा ग्वाही दिली होती, तरीही ते शक्य झाले नाही. शेवटी हिंन्दु-मुसलमान जे इकडून तिकडे आणि तिकडून इकडे आले-गेले, त्यांनी ज्या वेदना भोगल्या, जी दगडफेक अनुभवली, ज्या दंगली, लुटमार अनुभावल्या, सामुहिक हल्ले झालेत, रक्तपाट झाला, महिलांवरील अत्याचाराच्या घटना झाल्या, कत्तली केल्या गेल्या त्यांच्या स्मृती पुन्हा जागवायच्या की स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद साजरा करायचा ? असा प्रश्न देशातील सामान्यजनांच्या मनात पंतप्रधानांच्या त्या घोषणेने निर्माण केला आहे.   स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असतांना आम्ही या देशातील स्वातंत्र्यप्राप्तीचा शंभर वर्षांचा सुवर्णमयी १५ ऑगस्ट कसा साजरा करणार याचा २५ वर्षांचा विकासाचा, शक्तिशाली भारताचा, विश्वभारताचा रोडमॅप तयार करण्याऐवजी वेदनादायी इतिहासाची कोरड्या जखमेवरची खपले काढत बसणार का ? जम्मू-काश्मिरच्या पंडितांना झालेल्या वेदना, त्यांचेवर झालेला अन्याय हा जम्मू काश्मिरला विशेषाधिकार देणारे ३७० कलम रद्द करून दूर करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. आता त्याला राज्याचा दर्जा देऊन त्या ठिकाणी जनतेत विश्वास निर्माण करण्याचे, जम्मू  काश्मिरला आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून अधिक सुंदर नगरी बनविण्याचे, त्या राज्यातील तरूणांना देशप्रेमी बनवून रोजगारक्षम करण्याचे आणि विस्थापित पंडितांची पूर्नस्थापना करण्याचे उपक्रम सरकारने हाती घेण्याची गरज आहे. पाकिस्तानला दुबळे  बनविण्यासाठी बांगला देशाची निर्मिती करून पंधानमंत्री इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचा हिशेब चुकता केला आहे. हा फाळणीचा एका अर्थाने सुडच नव्हे काय? बोलाचा भात उकडून शिळ्या कढीला फोडणी देऊन मनभेदाला प्रोत्साहन देण्याची खेळी या घोषणेच्या पदरात लपलेली असण्याची दाट शक्यता आहे. पंतप्रधानांची राजकीय मानसिकता ज्या विचारसणीच्या सहवासात विकसीत झाली त्या विचारसरणीला अपेक्षीत असलेली ही घोषणा आहे.फाळणीच्या वेदनांची स्मृती जागवायची म्हणजे या देशातील मुस्लीम बांधवांच्या कोरड्या झालेल्या जखमांची खपली काढून त्यावर मीठ चोळण्यासारखे आहे.या विचारसरणीला या देशातील हिंदू मुसलमान सतत समोरासमोर उभे ठाकावे अशी इच्छा असते,त्यासाठी अधूनमधून अशा प्रकारचा द्वाडपणा केला जातो.एव्हढेच या घोषणेचे तात्पर्य आहे.

COMMENTS