चक्रीवादळात केळीच्या बागा भुईसपाट; कराड तालुक्यातील विंग परिसरात 20 लाखांचे नुकसान

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चक्रीवादळात केळीच्या बागा भुईसपाट; कराड तालुक्यातील विंग परिसरात 20 लाखांचे नुकसान

तौक्ते चक्रीवादळानेकराड तालुक्यातील विंग विभागाला मोठा फटका बसला. तुफान वार्‍यामुळे झाडे उन्मळून पडली तसेच घरांचीह पडझड झाली. चचेगाव परिसरातील केळीच्या बागा मोडून पडल्या आहेत.

राजकीय सूड उगवण्यासाठी 30 कोटी केले शासनाला परत
चाळीसगावच्या दिंडीत…रंगला रिंगण सोहळा
 एसएससी बोर्डाच्या परीक्षेला आजपासुन सुरुवात

कराड / प्रतिनिधी : तौक्ते चक्रीवादळानेकराड तालुक्यातील विंग विभागाला मोठा फटका बसला. तुफान वार्‍यामुळे झाडे उन्मळून पडली तसेच घरांचीह पडझड झाली. चचेगाव परिसरातील केळीच्या बागा मोडून पडल्या आहेत. हातातोंडाला आलेला घास हिरावून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

तौक्ते चक्री वादळाने विंगसह विभागात वादळी वार्‍यासह पावसाने थैमान घातले. त्यात वार्‍याची गती अधिक होती. ठिकठिकाणची झाडे उन्मळून पडली. कराड तालुक्यातील चचेगाव येथील विलास पवार, साहेबराव पवार, हनुमंत हुलवान याच्या केळीची बागा भुईसपाट झाल्या. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. केळीची तोडणी करण्याअगोदरच वादळी वार्‍याने 20 लाखांहून अधिक नुकसान झाले आहे. पोतले येथील पंतोजी मळ्यात झाड सुभाष जगताप यांच्या घरावर कोसळल्याने नुकसान झाले. तेथील मारुती जगताप व सचिन जगताप यांच्या घरावरील पत्रे उडाले. प्रमिला पाटील यांच्या जनावरांच्या शेडवरील पत्रा उचकटला. 

येणके येथे सतीश गरुड यांच्या घराची भिंत कोसळली. अरविंद पवार व शिवाजी कणसे यांच्या घराच्या भिंती कोसळून नुकसान झाले. येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात चिंचेचे झाड उन्मळून इमारतीवर पडले. फांद्यांचा डोलारा छतावर अडकल्याने नुकसान टळले. महसूल विभागाने संबंधिताचे नुकसानीचे पंचनामे केले आहेत. वादळी वार्‍याने झाडे उन्मळून वीज वाहिन्यांवर पडल्याने विंगसह, घारेवाडी, पोतले, येणके आदी गावठाणातील वीजपुरवठा खंडित झाला होता. वीज उपकेंद्राच्या कर्मचार्‍यांनी वीजपुरवठा पूर्ववत केला.

COMMENTS