गोडसे-गांधी वाद किती आवश्यक?

Homeताज्या बातम्यासंपादकीय

गोडसे-गांधी वाद किती आवश्यक?

भारतीय राजकारणात आणि त्यापाठोपाठ समाजकारणात दोन व्यक्ती नव्हे तर दोन विचार म्हणून मान्यता पावलेले नथुराम गोडसे आणि आणि राष्ट्रपिता म.गांधी आपआपले स्थ

बलात्कार, आमदाराला धमकी आणि कर्माची सजा
जन्मदात्यांनीच रिक्षात सोडले नवजात बालकाला
चहाबाज नगरकर

भारतीय राजकारणात आणि त्यापाठोपाठ समाजकारणात दोन व्यक्ती नव्हे तर दोन विचार म्हणून मान्यता पावलेले नथुराम गोडसे आणि आणि राष्ट्रपिता म.गांधी आपआपले स्थान घट्ट टिकवून आहेत.खरेतर ही दोन्ही माणसं सामाजिक चळवळीशी नातं सांगणारे कट्टर विचार आहेत.मात्र त्यांच्या सामाजिक मान्यतेचा फायदा उचलून राजकीय स्वार्थ साधण्याची प्रवृत्ती भारतीय राजकारणात झपाट्याने विकसीत झाल्याने सारा खेळखंडोबा झाला आहे.योग्य कोण अयोग्य कोण? या वादात जाऊन सामाजिक ध्रूवीकरण करण्याचा दखलचा हेतू अजिबात नाही.तथापी सत्तेच्या स्वार्थासाठी या दोन्ही व्यक्तींना भारतीय राजकारणात कसे वापरले जाते,ते सांगण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे..*लिड*

नथुराम गोडसे हे भारतातील पहिले दहशतवादी आहेत हे तुम्ही मान्य करायला तयार आहात का? असा प्रश्न एका काँग्रेस नेत्याने भाजपच्या नेत्याला एका परिसंवादात विचारला होता.या प्रश्नानंतर सदर परिसंवादाचा मुड कसा बदलला असेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही.प्रश्न कर्ता अर्थातच गांधीवाद मानणारा.म.गांधी देशाचे राष्ट्रपिता.देशभरातच नव्हे तर जगभरात अहिंसेचा प्रचार करून मानवतेचा प्रसार करणारे शांतीदूत.अशा महात्म्याचा गोळी झाडून खून करणारा नथुराम गोडसे गांधीवाद्यांसाठी दहशतवादीच.

याऊलट नथुराम गोडसे हे सनातन धर्माचे अनुयायी.कट्टर हिंदूत्ववादी विचारसरणीचे म्हणून तत्कालीन हिंदूत्ववादी सावरकरांसारख्या नेतृत्वाचे कट्टर समर्थक.तत्कालीन राजकारणात गांधी आणि सावरकर या दोन नेत्यांमध्ये असलेले मतभेद सर्वश्रूत आहेत.नेत्यांमध्ये मतभेद असले तरी परस्परांचा आदर करण्याची प्रथा तेंव्हाही होति.वैचारिक मतभेद व्यक्तीगत मतभेदांना सहजासहजी स्वीकारत नव्हते.नेत्यांच्या पातळीवर असलेले हे वास्तव आजच्या प्रमाणे समर्थकांमध्येही स्वीकारार्ह मानले जात नव्हते.या वैचारिक मतभेदांना कार्यकर्त्यांच्या पातळीवर व्यक्तीगत पातळीवर नेले जात होते.गांधी सावकरांमधील मतभेद जेंव्हा टोकावर पोहचले तेंव्हा गोडसेंसारखे सावरकर समर्थकांमध्ये गांधी द्वेष विषासारखा पसरला.आणि त्यातूनच गांधी हत्याचे दुष्कृत्य घडले.या ठिकाणी या हत्येचे समर्थन अजिबात नाही.उलट आमच्या दृष्टीने ही हत्या घोर पापच आहे.मात्र दोन्ही पक्षांची बाजू काय असू शकते हे तटस्थपणे मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न आणि या दोन्ही विचारसरणीचा फायदा  आजचे राजकारणी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी कसा उचलतात ते दाखविण्याचा प्रयत्न  म्हणून ही दखल आहे.

दोन्ही बाजूचे समर्थक आज एव्हढे इरेला पेटले आहेत की,या इर्षेने फायदा तर नाहीच पण या देशाचे आपण कधीही भरून काढू शकणार नाही एव्हढे नुकसान करीत आहोत याचेही भान या मंडळींना राहीलेले नाही.जसे अरे ला कारे असे प्रत्युत्तर द्यावे इतक्या सहजपणे म.गांधींना नथुराम गोडसे किंवा नथुराम गोडसेंना म.गांधी असा पर्याय दिला जातो.गांधीवर एखादे साहित्य उपलब्धी होत असेल तर गोडसे प्रेमींमध्येही इर्षा निर्माण होते.तेच उलटही आहे. गांधींवर चित्रपट येतात, तर नथुराम गोडसेवर का नको, असा प्रश्न अशाच पध्दतीने अनेकांनी सोशल मीडियावर उपस्थित करण्यास सुरूवात केली आहे.. गोडसेचं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं स्वातंत्र्य या देशाच्या घटनेने दिलंय, अशी आठवण काहींनी करून दिली.

पण मारेकऱ्याला एवढे 3 तास देऊन हिंसेचं उदात्तीकरण का करायचं, असा प्रश्न दुसऱ्या बाजूने विचारला जातोय. हा सिनेमा येण्याआधीच बंदी घालण्याची मागणी  यातून पुढे येऊ लागली  आहे.

महेश मांजरेकरांनी गांधी जयंतीला ‘गोडसे’ या त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आणि भारतीय समाजातला दुभंग विचार  पुन्हा चव्हाट्यावर आला. त्यातूनच नथुराम गोडसेवर सिनेमा काढणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की मारेकऱ्याचं उदात्तीकरण? असाही प्रश्न समाजमाध्यमांची भिंत रंगवू लागला.भारताच्या विकासात अशा वादाची खरोखर भुमिका आहे का? भारातासमोर कुठला प्राधान्यक्रम महत्वाचा आहे? या गोष्टींचा विचार कुणीही करायला तयार नाही.

खरे तर भारतीय राजकारणात आणि त्यापाठोपाठ समाजकारणात दोन व्यक्ती नव्हे तर दोन विचार म्हणून मान्यता पावलेले नथुराम गोडसे आणि आणि राष्ट्रपिता म.गांधी आपआपले स्थान घट्ट टिकवून आहेत.खरेतर ही दोन्ही माणसं सामाजिक चळवळीशी नातं सांगणारे कट्टर विचार आहेत.मात्र त्यांच्या सामाजिक मान्यतेचा फायदा उचलून राजकीय स्वार्थ साधण्याची प्रवृत्ती भारतीय राजकारणात झपाट्याने विकसीत झाल्याने सारा खेळखंडोबा झाला आहे.योग्य कोण अयोग्य कोण? या वादात जाऊन सामाजिक ध्रूवीकरण करण्याचा दखलचा हेतू अजिबात नाही.तथापी सत्तेच्या स्वार्थासाठी या दोन्ही व्यक्तींना भारतीय राजकारणात कसे वापरले जाते,ते सांगण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.भारतीय राजकारणात भावनांना हात घातला की समाजमनावर हिंदोळणाऱ्या भावनिक लहरींवर स्वार होऊन सत्तेचा किनारा सहजपणे गाठता येतो.याची खात्री राजकारण्यांना पटल्याने गोडसे-गांधीवाद सतत धुमसत ठेवण्यातच या मंडळींना स्वारस्य आहे.हा वाद खरोखर मिटला तर समाजात ऐतिहासिक सख्य स्थापन होईल आणि मग या मंडळींचे राजकीय अस्तित्वच धोक्यात येईल.म्हणून राजकारण आहे तोवर हा वाद असाच पेटवला जाणार.मग भलेही जनतेने महासत्ता होण्याचे दिवा स्वप्न पहात आपले आयुष्य कंठत रहावे.

COMMENTS