Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मर्यादा संपल्यावर मराठे करेक्ट कार्यक्रम करतात

मनोज जरांगे यांचा आता थेट मुख्यमंत्र्यांनाच इशारा

सोलापूर : मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आक्रमक आणि एकेरी भाषेत टीका कर

सरकारने मोटरसायकल दिली, पण पेट्रोल काढून घेतलं – मनोज जरांगे
मनोज जरांगे आणि अशोक चव्हाण यांच्यात खलबते
आरक्षणप्रश्‍नी तोडगा नाही, केवळ दिशाभूल

सोलापूर : मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आक्रमक आणि एकेरी भाषेत टीका करत होते. मात्र सोमवारी मर्यादा संपल्यावर मराठे करेक्ट कार्यक्रम करतात असा इशाराच मनोज जरांगे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. जरांगे सोलापूर जल्ह्याचा दौर्‍यावर असून माध्यमांशी बोलतांना त्यांनी ही टीकाकेली आहे.
यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांची भाषा आता एकनाथ शिंदे देखील बोलू लागले आहेत. एकनाथ शिंदे यांचे शब्द ऐकत आम्ही सहा महिने त्यांना वेळ दिला, पण ते देखील आता आम्हाला बोलू लागले आहेत. मर्यादा संपली की मराठे करेक्ट कार्यक्रम करत असतो. नऊ तारखेपर्यंत आम्ही वाट बघणार आहोत, त्यानंतर काय निर्णय घ्यायचा ते घेऊ. समाजाचे म्हणणे आहे की तुम्ही उपोषण करू नका. समाजाच्या विरोधात जाऊन राजकीय अस्तित्व निर्माण करता येणार नाही हे सरकारला लक्षात कसे येत नाही. सहा महिने तुम्ही आमचे फुकटचे घालवले आहात, आता आरक्षण गनिमी काव्याने कसे मिळवू ते तुम्हाला दाखवून देऊ, असेही जरांगे पाटील म्हणाले आहेत.  पुढे बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, ज्वलंत मराठा समाजाला अंगावर घेऊन, सरकार निवडणुका घेणार नाही. निवडणुका होणारच नाही, तर मराठा मतदान कोणाच्या बाजूने देणार हा प्रश्‍नच नाही. सरकारने जाणीवपूर्वक खोटे आरोप सुरु केले असून, कार्यकर्त्यांना गुंतवायला सुरु केलं आहे. सगेसोयर्‍यांच्या संदर्भात अधिसूचना काढली आहे, मात्र त्याची कोणतीही अंमलबजावणी केली जात नाही. दहा टक्के आरक्षण देऊन समाज समाधानी आहे, असे देवेंद्र फडणवीस बोलत आहेत. माझा राजकीय मार्ग नाही, पण मराठ्यांचा इतका ज्वलंत प्रश्‍न असताना सरकार निवडणुका घेणार नाही. शेकडोंची उमेदवारी दाखल करण्यासंदर्भात निर्णय समाजाने घेतला आहे, तो निर्णय समाजाचा आहे. तर, मी समाजाचा मालक नाही समाज माझा मालक असल्याचे जरांगे म्हणाले आहेत.

COMMENTS