पुणे : पुणेकरांनी मागील वर्षीप्रमाणेच या वर्षीही दीड दिवसांच्यागणपतीचे घरी व महापालिकेच्या हौदात विसर्जन करून स्वयंशिस्त पाळली. याचपद्धतीने पुढील दिव
पुणे : पुणेकरांनी मागील वर्षीप्रमाणेच या वर्षीही दीड दिवसांच्या
गणपतीचे घरी व महापालिकेच्या हौदात विसर्जन करून स्वयंशिस्त पाळली. याच
पद्धतीने पुढील दिवसातही मुखदर्शनासाठी गर्दी करण्याचे टाळून ऑनलाईन
दर्शनालाच प्राधान्य द्यावे. त्यामुळे कोरोनामुळे निर्माण होणारा धोका
कमी होऊ शकेल,’’ असे आवाहन पोलिस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी केले.
गणेशोत्सवाच्या तिसर्या दिवशी शहराच्या मध्यवर्ती भागात नागरीकांनी
दर्शनासाठी गर्दी केली होती. या पार्श्वभुमीवर डॉ.शिसवे यांनी
नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले. शिसवे म्हणाले, दिड दिवसांच्या
गणपतींचे याही वर्षी घाटांवर विसर्जन न करतान नागरिकांनी घरी व
महापालिकेच्या हौदात करून शासनाच्या आचारसंहीतेचे पालन केले. हिच
स्वयंशिस्त पुढील काही दिवस पाळायची आहे. काही मंडळे रस्त्यांवर असल्याने
नागरिक ये-जा करताना श्रींचे दर्शन घेतात. त्यामुळे रस्त्यावर काही
प्रमाणात गर्दी होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.
म्हणूनच नागरिकांनी मुखदर्शनाऐवजी ऑनलाईन दर्शनालाच प्राधान्य द्यावे.’’
COMMENTS