गरज भासल्यास दहशतवाद्यांच्या तळावर हल्ले करू : राजनाथ सिंह

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गरज भासल्यास दहशतवाद्यांच्या तळावर हल्ले करू : राजनाथ सिंह

चेन्नई : भारताच्या सीमेवर आव्हाने असूनही भारताच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा जनतेला विश्‍वास आहे. भारत केवळ आपल्या भूमीवरील दहशत

चालकाला फिट आल्याने थेट गॅरेज मध्ये घुसली कार
मनोज जारांगे यांच्या उपोषणाला निमगाव को. ग्रामस्थांचा पाठिंबा
  शाळेत 10 मिनिटे उशिरा पोहचल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने बेदम मारहाण केली    

चेन्नई : भारताच्या सीमेवर आव्हाने असूनही भारताच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा जनतेला विश्‍वास आहे. भारत केवळ आपल्या भूमीवरील दहशत संपवणार नाही, तर गरज पडल्यास दहशतवाद्यांच्या भूमीवर हल्ला करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिला आहे. तामिळनाडूच्या वेलिंग्टनमधील डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेजला (डीएसएससी) संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी बोलतांना राजनाथ सिंह म्हणाले की, उत्तरेकडे जिथे गेल्या वर्षी सीमेवरील स्थिती बदलण्याचा एकतर्फी प्रयत्न झाला होता. तेथेही आम्ही आमच्या जुन्या प्रतिक्रियेपासून बदलत नवीन गतिशीलतेसह सामोरे गेलो आहोत. आज शत्रूला सीमेत प्रवेश करण्याची गरज नाही. ते सीमेच्या बाहेरून आमच्या सुरक्षा उपकरणांनाही लक्ष्य करू शकतात. जागतिक शक्तीच्या बदलत्या वातावरणामुळे आधीच बदलत्या सुरक्षा आव्हानांमध्ये भर पडली आहे. काळानुसार सुरक्षेच्या दृष्टिकोनात बदल हे आजचे वास्तव आहे. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, आपली तयारी सातत्याने बळकट करणे आणि एक मजबूत धोरण बनवणे ही काळाची गरज आहे आणि मागणीदेखील आहे. ते देशामध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण करू शकतात. गेल्या 75 वर्षांचा इतिहास पाहिला तर असे दिसते की, आपल्याला आव्हाने वारशाने मिळाली असल्याचा उल्लेख यावेळी राजनाथ सिंह यांनी केला.

COMMENTS