जयहिंद लोक चळवळीच्या ग्लोबल कॉन्फरन्स मध्ये शनिवारी व रविवारी खा.सुप्रिया सुळे,सत्यजीत तांबेंसह विविध मान्यवर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जयहिंद लोक चळवळीच्या ग्लोबल कॉन्फरन्स मध्ये शनिवारी व रविवारी खा.सुप्रिया सुळे,सत्यजीत तांबेंसह विविध मान्यवर

संगमनेर ( प्रतिनिधी )सदृढ लोकशाही व निरोगी समाज निर्मितीसाठी कार्यरत असणार्‍या जयहिंद लोकचळवळ महाराष्ट्र रायाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यां

योगासनाचा समावेश क्रीडा प्रकारात करावा
आयटीआयमधील प्रशिक्षणार्थींच्या विद्यावेतनात वाढ
एमपीएससींच्या परीक्षांचे शुल्क कमी करा

संगमनेर ( प्रतिनिधी )
सदृढ लोकशाही व निरोगी समाज निर्मितीसाठी कार्यरत असणार्‍या जयहिंद लोकचळवळ महाराष्ट्र रायाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दुसर्‍या ग्लोबल कॉन्फरन्स मध्ये 9 ऑक्टोबर व 10 ऑक्टोबर 2021 रोजी होणार्‍या ऑनलाईन संवादात खा.सुप्रिया सुळे,खा.महुआ मोईत्रा, जिल्हाधिकारी निधी चौधरी,रणजित देसले,सौ.दुर्गाताई तांबे,सत्यजीत तांबे,डॉ.जयश्री थोरात यांसह जगभरातील विविध मान्यवर सहभागी होणार असल्याची माहिती जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली आहे.

दुसर्‍या ग्लोबल कॉन्फरन्स मधील 9 ऑक्टोबर व 10 ऑक्टोबर च्या कार्यक्रमाबाबत माहिती देताना आ. डॉ. तांबे म्हणाले की, शनिवार दिनांक 9 ऑक्टोबर 2021 रोजी पहिल्या सत्रात सायं 7 ते 8 या वेळेत प्रगत जगासाठी युवकांचे योगदान या विषयावर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे,अमेरिकेचे जस्थीन मुसेल्ला,पहिले दक्षिण आशियाई मेयर सदफ झाफर,न्युझिलंड मधील राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष एलन डिक्सन,निखील उटकुर,सचिन इटकर सहभागी होणार आहेत. तर शिक्षण हे बलशाली भारताची गुरुकिल्ली या विषयावर आ.डॉ.सुधीर तांबे,अमेरिकेचे वायने रायाचे प्रतिनिधी डॉ.अनिल कुमार,ग्लोबल टिचर विजेते रणजित देसले,सुगन बरंठ,हेरंब कुलकर्णी,राजू चिनथाला,सिध्दार्थ मुकणे,देवादर्शन,निविशा हे अमेरिकेतून तर विजय जोशी हे ऑस्ट्रिलियातून सहभागी होणार आहे.

रविवार दिनांक 10 ऑक्टोबर 2021 रोजी संध्याकाळी 7 वा सशक्त महिला ,सशक्त भारत या विषयावर खासदार सुप्रिया सुळे,खा.महुआ मोईत्रा,अमेरिकेतील मिशीगन मधील आमदार पद्मा कुप्पा,सौ.दुर्गाताई तांबे, डॉ.जयश्री थोरात,अमेरिकेहून केशाराम,जिल्हाधिकारी निधी चौधरी,मॉल्ली माँक, प्रवला तत्ते,रजिया पटेल, डॉ.श्रुती तांबे,डॉ.अभंय बंग,अरुणा साबने हे सहभागी होणार आहेत.

ही ग्लोबल कॉन्फरन्स सर्व देशांमध्ये उपलब्ध होणार असून जय हिंद च्या http://www.facebook.com/jaihindpeoplesmovement/ या फेसबुक पेज व सर्व सोशल माध्यमांवर उपलब्ध असणार आहे.

तरी आंतरराष्ट्रीय त-ाांचा सहभाग असलेले या प्रथम ग्लोबल कॉन्फरन्समध्ये अधिकाधिक तरुणांनी व नागरिकांनी सहभाग घ्यावा असे अवाहन जयहिंद लोकचळवळीच्या समन्वयक उत्कृषा रुपवते,डॉ.सुरज गवांदे,संकेत मुनोत व जयाहिंद लोकचळवळ सर्व विभागांच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS