कोविशिल्ड-कोव्हॅक्सिन लसीचे कॉकटेल प्रभावी ;भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून दावा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोविशिल्ड-कोव्हॅक्सिन लसीचे कॉकटेल प्रभावी ;भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून दावा

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटाचा सामना करतांना विविध प्रकारचे संशोधन सुरु आहे. कोरोना प्रतिबंधकतेसाठी वेगवेगळया लशींचा पहिला आणि दुसरा डोस देता येऊ शक

राहात्यातील विद्यार्थ्यांची मर्दानी खेळांसाठी निवड
मुस्लिम धर्मगुरु सलमान अजहरींना अटक
लसीकरणासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा : केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटाचा सामना करतांना विविध प्रकारचे संशोधन सुरु आहे. कोरोना प्रतिबंधकतेसाठी वेगवेगळया लशींचा पहिला आणि दुसरा डोस देता येऊ शकतो का? याचे संशोधन नुकतेच करण्यात आले. या संशोधनाआधारे कोविशिल्ड- कोव्हॅक्सिनचा एकत्रित डोस घेतल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि त्याचा चांगला प्रभावी परिणाम होत असल्याचा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आयसीएमआरकडून करण्यात आला आहे.
कोव्हॅक्सिन तसेच कोव्हिशीड या कोरोना लशीचा एकत्रित डोस कॉकटेल देवून करण्यात आलेल्या अभ्यासात सकारात्मक निष्कर्ष समोर आले आहे. एडिनोव्हायरस वेक्टर प्लॅटफॉर्म-बेस्ड व्हॅक्सिनच्या एकत्रितकरणाने लस सुरक्षित तसेच रोगप्रतिरोधक क्षमतावर्धक आढळल्याचे निष्कर्ष आयसीएमआरने वर्तवले आहे. गेल्या महिन्यात भारताच्या औषध महानियंत्रकांच्या (डीसीजीआय) एक विशेषतज्ञांच्या समितीने कोव्हिशील्ड- कोव्हॅक्सिन कोरोना लशींच्या एकत्रित डोस वर अभ्यास करण्याची शिफारस केली होती. ़वेल्लोर येथील ख्रिश्‍चन वैद्यकीय महाविद्यालयाकडून (सीएमसी) यासंबंधी परवानगी मागण्यात आल्यानंतर ही शिफारस करण्यात आली होती. लशींचा कोर्स पूर्ण करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला दोन वेगवेगळ्या लशींचा डोस दिला जावू शकतो का? जर कुणाला कोव्हिशील्डचा एक डोस आणि कोव्हॅक्सिनचा एक डोस दिला तर तो प्रभावकारक ठरेल का? याचा शोध घेण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला होता, अशी माहिती सेंट्रल ड्रस्ग स्टँन्डर्ड कंट्रोल ऑर्गनायजेशनच्या (सीडीएससीओ) विषयतज्ञ समितीकडून देण्यात आली आहे. कोरोनावर कोव्हिशील्ड तसेच कोव्हॅक्सिनचे एकत्रित डोस देखील बरेच फायदेकारक असल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे. वेल्लोरमधील ख्रिश्‍चियन मेडिकल कॉलेजला कोविड-19 च्या मिश्र चाचणीची परवानगी मिळाली होती. केंद्रीय औषध नियमक मंडळाच्या एका समितीने ही शिफारस केली होती. त्याला मंजुरी दिल्यानंतर चाचणी करण्यास सुरुवात करण्यात आली होती. कोविशिल्ड- ही लस ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेकाने तयार केली आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये या लसीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरु आहे. या लसीचे ठराविक अंतराने दोन डोस दिले जात आहेत. यूके व्हेरिएंट (बी 117) आणि दक्षिण आफ्रिका व्हेरिएंट (बी 1351) वर प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. भारत सरकारने या लसीला मान्यता दिली आहे. कोव्हॅक्सिन ही स्वदेशी लस आहे. भारत बायोटेकने या लसीची निर्मिती केली आहे. या लसीचे दोन डोस दिल्यानंतर प्रभावी ठरत आहे. ही लस यूके व्हेरिएंटसह अन्य व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. या लसीला भारतात मान्यता देण्यात आली असून मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे. सध्या या लसीचं 2 ते 18 वयोगटातील मुलांवर क्लिनिकल ट्रायल सुरु आहे.

COMMENTS