गणेश मंडळांना गतवर्षीचाच परवाना यंदाही चालणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गणेश मंडळांना गतवर्षीचाच परवाना यंदाही चालणार

पुणे : परवानगीसाठी होणारी गणेश मंडळांची पळापळ यंदा थांबण्याची शक्यता आहे. गणेश मंडळांना दरवर्षी घ्यावी लागणारी महापालिका आणि पोलीस प्रशासनाची परवानगी

आकाशातून पडली उल्कासदृश्य वस्तू | LOK News 24
सुधा मूर्तीं यांची राज्यसभेवर निवड
आजचे राशीचक्र रविवार, ०७ नोव्हेम्बर २०२१ अवश्य पहा (Video)

पुणे : परवानगीसाठी होणारी गणेश मंडळांची पळापळ यंदा थांबण्याची शक्यता आहे. गणेश मंडळांना दरवर्षी घ्यावी लागणारी महापालिका आणि पोलीस प्रशासनाची परवानगी यंदाही घ्यावी लागणार नाही. गतवर्षी घेतलेलीच परवानगी यंदा ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले आहे.
शहरातील गणेश मंडळांना दरवर्षी महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून मंडप व इतर परवाने दिले जातात. या परवान्यांसाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांना महापालिका व पोलीस प्रशासनाकडे चकरा माराव्या लागतात. परवान्यांना वेळ लागत असल्याने कार्यकर्त्यांना तासनतास थांबावे लागते. त्यामुळे या परवान्यांसाठी दोन्ही प्रशासनांनी एकत्र येवून एक खिडकी योजनेद्वारे परवाने द्यावेत, अशी मागणी दरवर्षी गणेश मंडळांकडून केली जाते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परवान्यासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी, कोणत्याही प्रकारची सजावटच व भव्य मंडप न टाकता गणेशोत्सव साधेपणाने व घरच्या घरी साजरा करण्यासाठी गतवर्षी नवीन परवाने न देता जुन्येच परवाने ग्रहीत धरण्यात आले होते. सध्याही शहरावर कोरोनाचे व तिसर्या लाटेचे सावट आहे. या पार्श्वभूमवर येणार्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने महापालिकेत अधिका-यांची बैठक झाली. या बैठकीत शासनाच्या आदेशानुसार गतवर्षामाणे यंदाही साधेपणानेच साजरा व्हावा, गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची गर्दी टाळावी, यासाठी गतवर्षीचाच मंडप परवाना यंदाही ग्राह्य धरण्याचे निश्चित करण्यात आले.

COMMENTS