कट मारल्याच्या कारणावरून एकाच्या खुनाचा प्रयत्न

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कट मारल्याच्या कारणावरून एकाच्या खुनाचा प्रयत्न

कट मारल्याच्या कारणावरून नऊ जणांच्या जमावाने एकास लोखंडी गज, लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला.

पत्रकार बाळ बोठेला हायकोर्टाचा दणका ; जामीन अर्ज फेटाळला | DAINIK LOKMNTHAN
अखेर कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन सुटले
शाळेतील मुलांनी घेतले जलशुद्धीकरण व अग्निशामनचे धडे

अहमदनगर/प्रतिनिधी- कट मारल्याच्या कारणावरून नऊ जणांच्या जमावाने एकास लोखंडी गज, लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. ही घटना कामरगाव ता. नगर येथे घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की जितेंद्र पंजाब भोसले (वय30, राहणार कामरगाव, तालुका नगर) हा घरी असताना पंकज भोसले हा त्याच्या घरी गेला व त्याला घरा मागे नेऊन, तू माझा मुलगा सागर याला कट का मारला, असे म्हणून लोखंडी गजाने मारहाण केली. यावेळी सोनाली भोसले व पंकज भोसले यांनी दांडक्याने मारहाण केली व अन्य साथीदारांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत आमच्या नादाला लागलास तर ठार मारून टाकू अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी जितेंद्र भोसले यांच्या फिर्यादीवरून भादवि कलम 307, 143, 147, 148, 149, 34, 504, 506  प्रमाणे खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रितेश राऊत करीत आहेत.

COMMENTS