आम्ही समोरुन कोथळा काढतो, पाठीमागून नाही… पाठीमागून वार करण्याची शिवसेनेची परंपरा नाही

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आम्ही समोरुन कोथळा काढतो, पाठीमागून नाही… पाठीमागून वार करण्याची शिवसेनेची परंपरा नाही

प्रतिनिधी शिरूरशिवसेना खासदार संजय राऊत आज पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी शिरुर लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांना त्यांनी संबोधित केले. शिरुर लोकस

आवाज मूकनायकाचा.. आवाज बहुजन समाजाचा.. मूकनायक दिनविशेष कार्यक्रम | LOKNews24
बेस्टच्या दुप्पट अनामत रक्कम वसुलीला राजकीय पक्षांचा विरोध
अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य !

प्रतिनिधी शिरूर
शिवसेना खासदार संजय राऊत आज पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी शिरुर लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांना त्यांनी संबोधित केले.

शिरुर लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळचा शिवसेनेचा गड होता आढळराव पाटील यांनी तिथूनच खासदारकीची हॅट्रिक केली. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत चौकार मारण्यापासून त्यांना राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांनी त्यांना पराभूत केले .

आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघात शिवसनेची ताकद वाढविण्यासाठी सेनेतील नेते सक्रिय झाले आहे . शिरुर आणि जुन्नर मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकेल असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला .

राऊत यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना पक्ष वाढीसाठी कामाला लागण्याचे आवाहन केले आहे . यातून राऊत यांनी अप्रत्यक्षपणे खा. कोल्हे आणि आमदार अतुलशेठ बेनके यांचा पराभूत करण्याचा मनसुबा बोलून दाखवला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आपले आहेत. अजित पवार देखील आपले आहेत. दिलीप वळसे गृहमंत्री असतील, मात्र शिवसेना सगळ्यांच्या वर आहे, असे म्हणत राऊत यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघात जाऊन राष्ट्रवादीला टोला लगावला आहे . तसेच भाजपावरही निशाणा साधला. भाजपला अजूनही शिवसेनेची गरज लागते, असे राऊत म्हणाले.

तसेच राऊत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीकास्त्र सोडले . चंद्रकांत पाटील यांना मी चंपा म्हणणं बरोबर नाही. ते म्हणाले 105 आमदार आहेत तरी आमचा मुख्यमंत्री नाही. 105 वाले चोळत बसलात.

त्यांना वाटलं ते येतील, पण आले नाहीत, अशी टीका त्यांनी केली. खंजीर खुपसणं म्हटले की पहिले नावं यायचे शरद पवारांचं यायचं मात्र आता उद्धव ठाकरेंचे येते , असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. यावरूनही राऊत यांनी पाटील यांचा समाचार घेतला .

आम्ही समोरुन कोथळा काढतो, पाठीमागून नाही… पाठीमागून वार करण्याची शिवसेनेची परंपरा नाही. शब्द तुम्ही फिरवला आम्ही नाही, असे प्रत्युत्तर राऊतांनी चंद्रकांत पाटील यांना दिले आहे .

देशातल्या पहिल्या पाच लोकप्रिय मुख्यमंत्र्यांत उद्धव ठाकरे आहेत. एक दिवस उद्धव ठाकरे देशाचं नेतृत्व केल्याशिवाय राहणार नाहीत. अनेक जण शिवसेना बुडवण्यासाठी पाण्यात बसले आहे. मात्र बाल बाका होऊ शकला नाही. बाळासाहेब म्हणायचे माझा ऑक्सिजन हा माझा शिवसैनिक आहे, असेही राऊत म्हणाले .

राज्यात ठाकरे सरकार आहे. अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना हे मंदिर आहे. मधल्या काळात जे शिवसेनेच नुकसान झाले ते न भरून येणारे आहे. शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीतला भगवा खाली उतरला.

घरात भांडण हे होत असतात. आपण टोकाचे निर्णय घेतो. जो शिवसेनेतून दूसऱ्या घरात जातात ते सुखी नसतात. अनेक बोचकी शिवसेनेतून गेली. जे गेले त्यांना आता परत घ्यायचे नाही,असेही राऊत यांनी सांगितले .

COMMENTS