मीराबाई चानूची रौप्यपदकाची कमाई

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मीराबाई चानूची रौप्यपदकाची कमाई

टोकियो- भारताची आघाडीची वेटलिफ्टर मीराबाई चानूने ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आपला डंका वाजवत रौप्यपदक पटकावले. मीराबाईने 49 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले

नीरज चोप्राचे निर्भेळ यश
ऑलिम्पिकमध्ये पी. व्ही. सिंधूने पटकावले कांस्यपदक
ऑलिम्पिक प्रसारणात प्रसारभारतीची नेत्रदीपक कामगिरी

टोकियो- भारताची आघाडीची वेटलिफ्टर मीराबाई चानूने ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आपला डंका वाजवत रौप्यपदक पटकावले. मीराबाईने 49 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले आहे. भारतीय वेटलिफ्टिंगच्या इतिहासातील ऑलिम्पिकमधील हे भारताचे दुसरे पदक आहे.
मीराबाईने स्नॅच आणि क्लीन अँड जर्क राउंडमध्ये मिळून तब्बल 202 किलो वजन उचलत रौप्य पदक पटकावलं आहे. मीराबाईने स्नॅच राउंडमध्ये 87 किलो तर क्लीन अँड जर्कमध्ये 115 किलो वजन उचलत हे यश मिळवलं. तर 49 किलोग्राम वर्गात चीनच्या जजिहु हिने सुवर्ण पदक पटकावलं आहे. 49 किलोग्राम वर्गात महिला वेटलिफ्टिंगची सुरुआत स्नॅच राउंडने झाली. ज्यात मीराबाईने पहिल्या प्रयत्नात 81 किलोग्राम वजन उचललं. ज्यानंतर दुसर्‍या प्रयत्नात 87 किलोग्राम वजन उचलंल. तिसर्‍या प्रयत्नात तिने 89 किलोग्राम वजन उचलण्याचा प्रयत्न केला पण ती अयशस्वी ठरली आणि केवळ 87 किलोग्रामच उचलू शकली. त्यामुळे स्नॅच राउंडमध्ये ती दुसरी आली. त्यात चीनच्या जजिहु हिने 94 किलो वजन उचलत पहिला क्रमांक पटकावला. त्यानंतर क्लीन अँड जर्क राउंडची सुरुवात झाली आमि मीराबाईने पहिल्या प्रयत्नातच अप्रतिम कामगिरी करत 110 किलो वजन उचलला. त्यानंतर दुसर्‍या प्रयत्नात 115 किलो वजन उचललं. पण अखेरच्या तिसर्‍या प्रयत्नात 117 किलो वजन उचलण्यात ती अयशस्वी ठरली. ज्यामुळे तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. सिडनी ऑलिम्पिक (2000) मध्ये भारताने यापूर्वी वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकले होते. कर्णम मल्लेश्‍वरीने हे पदक भारताला मिळवून दिले होते. ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी मीराबाई चानू ही पहिली भारतीय वेटलिफ्टर आहे.

पद्मश्री मीराबाई चानू
26 वर्षीय मीराबाई ही मूळची मनिपूर राज्यातील असून तिचे संपूर्ण नाव साइखोम मीराबाई चानू असे आहे. ती भारताची आघाडीची महिला वेट लिफ्टर आहे. 2018 मध्ये तिला भारत सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने देखील सन्मानित केलं होतं. 2018 मध्ये तिला क्रीडा विभागातून पद्मश्री पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला होता.

COMMENTS