Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात कोयता गँगची दहशत सुरूच

गुंडांच्या मुसक्या आवळण्याचे पोलिसांसमोर आव्हान

पुणे ः पुणे शहरात मागील काही दिवसातंपासून कोयता गँगचे प्रस्थ वाढताना दिसत असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. हडपसर परिसरातील म

पिंपरी-चिंचवडमध्ये कोयता गँगचा धुमाकूळ
पुण्यात कोयता गँगची दहशत सुरूच
केज येथील दोन विधीज्ञा वर पुण्याच्या कोयता गँगचा हल्ला

पुणे ः पुणे शहरात मागील काही दिवसातंपासून कोयता गँगचे प्रस्थ वाढताना दिसत असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. हडपसर परिसरातील मांजरी रेल्वे स्टेशन जवळ एका घरात पाच अज्ञात चोरटयांनी थेट घरात शिरुन कुटुंबातील व्यक्तींना कोयत्याचा धाक दाखवून मोबाईल फोन व रोख रक्कम असा 14 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जबरीने पळवून नेल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली.

याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात पाच अनोळखी इसम विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अमर मौला तांबोळी (वय 41) यांनी पोलीसांकडे आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. तांबोळी यांचे मित्र गोकुळ वर्मा हे मांजरी परिसरात राहत असून त्यांचे घरी जेवणासाठी ते 25 डिसेंबर रोजी रात्री गेले होते. त्यावेळी अनोळखी पाच व्यक्तींनी त्यांचे मित्राचा घराचा दरवाजा जोरात ढकलुन घरात शिरुन त्यातील एका इसमाने कोयता उगारुन पाठीवर उजव्या दंडाजवळ कोयता मारुन तसेच गोकुळ वर्मा यांचे गळयाला चाकू लावून शिवीगाळ करत, आवाज करु नका नाहीतर खल्लास करीन अशी धमकी देऊन त्यांचा व त्यांच्या मित्राचा मोबाईल फोन व रोख रक्कम असा 14 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने नेण्यात आला. तक्रारदार हे घाबरलेले असल्याने त्यांनी याबाबत उशीराने तक्रार दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत पुढील तपास सहाय्याक पोलिस निरीक्षक एस जाधव करत आहे. येरवडा परिसरातील गुंजन चौकातील बस स्टॉप जवळ 1 जानेवारी रोजी रात्री पावणेबारा वाजता कृष्णा रघुनाथ इंगळे (वय 24,रा.लिंक रोड,पुणे) हा तरुण त्याच्या मित्रासह जात होता. त्यावेळी सदर ठिकाणी काही मुले गोंधळ करीत असल्याने कृष्णा व त्याचा मित्र त्याठिकाणी काय गोंधळ सुरु पाहण्यासाठी थांबले. त्यावेळी एका अनोळखी इसमाने त्याच्याकडे पैसे मागुन त्याचे खिसे तपासले तेव्हा त्यास पैसे न मिळाल्याने, सदर गोष्टीचा राग मनात धरुन त्याने कृष्णास शिवीगाळ करुन दुसर्‍या अनोळखी ईसमाने तक्रारदार याच्या पोटाच्या डाव्या बाजूस चाकू खुपसून त्याचे पैसे लुटण्याचा प्रयत्न करुन त्यास गंभीर दुखापत केली आहे. या घटनेनंतर तरुणाने ससून रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर येरवडा पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

COMMENTS