Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार रोहित पवार क्रिकेटच्या मैदानात

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

पुणे/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यापूर्वी क्रिकेटच्या बीसीसीआय आणि आयसीआय सारख्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनांचे अ

 बेताल वक्तव्य करणाऱ्या राजकीय लोकांनी महापुरुषांचा इतिहास वाचावा – डॉ.शरद बाविस्कर
श्रीदेवीचा मृत्यू कसा झाला? पती बोनी कपूर यांनी 5 वर्षांनंतर केला खुलासा
FILMY MASALA : सुनील शेट्टीच्या मुलाच्या ‘तडप’ चा टीझर रिलीज (Video)

पुणे/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यापूर्वी क्रिकेटच्या बीसीसीआय आणि आयसीआय सारख्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनांचे अध्यक्षपद भूषवले आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आमदार रोहित पवारांनी देखील क्रिकेटच्या मैदानात पाऊल टाकले असून, त्यांची महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनची कमिटीची बैठक रविवारी पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर झाली. यात अगोदर महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या 16 सदस्याच्या कमिटीमध्ये रोहित पवारांची निवड झाली. खासदार शरद पवार यांनीसुद्धा मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीसाठी कंबर कसली होती. भाजपकडूनही निवडणुकीची जोरदार तयारी केली होती. यात भाजपच्या आशिष शेलार यांच्याशी या निवडणुकीसाठी त्यांनी युती केली होती. आता रोहित पवार यांचीही क्रिकेटमध्ये एन्ट्री झाली आहे. रोहित पवार यांसोबतच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, संघटनेवर खेळाडूंना प्राधान्य देण्याच्या बाबतीत महाराष्ट्र क्रिकेट संघटना देखील मागे राहिली. महाराष्ट्राचा माजी कर्णधार शंतनु सुगवेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. मात्र, त्याला फारशी साथ मिळाली नाही. निवडणूकीपूर्वी पडद्यामागे रंगलेल्या नाट्यात क्रिकेटचा पराभव झाला हेच या निवडणूकीच्या निकालावरून स्पष्ट झाले.

 महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत आभार मानले असून, क्रिकेट हा नेहमीच माझ्या आवडीचा खेळ राहिला असून, आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून क्रिकेट खेळाडूंसाठी काम करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा सोबत आहेतच. सर्वांना सोबत घेऊन खेळाडूंना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न राहील, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.
आमदार रोहित पवार

COMMENTS