Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘एएसआय’च्‍या पंचसूत्रीतून डॉक्‍टर, जनतेचे जोपासणार हित – डॉ. नियोगी

मॅसिकॉन २०२४'च्‍या औपचारिक उद्‌घाटन कार्यक्रमात साधला संवाद

नाशिक- राष्ट्रीय स्‍तरावर असोसिएशन ऑफ सर्जन्‍स ऑफ इंडियाने धोरण आखले आहे. त्‍यानुसार शस्‍त्रक्रियेदरम्‍यान रुग्‍णाच्‍या सुरक्षिततेवर भर देतांना आ

पुण्यात गाडी घासल्याच्या कारणावरून तरुणाची हत्या
राज्यात सोमवारपासून वाजणार शाळांची घंटा
थोरात यांच्या पाठपुराव्यातून मेंगाळ कुटुंबीयांना 10 लाखाची मदत

नाशिक– राष्ट्रीय स्‍तरावर असोसिएशन ऑफ सर्जन्‍स ऑफ इंडियाने धोरण आखले आहे. त्‍यानुसार शस्‍त्रक्रियेदरम्‍यान रुग्‍णाच्‍या सुरक्षिततेवर भर देतांना आवश्‍यक उपाययोजनांसंदर्भात चर्चा घडविली जाते आहे. शल्‍यचिकित्‍सकांची सुरक्षा, या क्षेत्रात येणारे युवा शल्‍यचिकित्‍सक यांचे प्रशिक्षण, सामाजिक जाणीवेतून सर्वसामान्‍यांना प्रथोपचारासंदर्भातील प्रशिक्षण असा पंचसूत्री कार्यक्रम राबविला जात असल्‍याची माहिती ‘एएसआय’चे अध्यक्ष डॉ. प्रोबल नियोगी (प्रयागराज) यांनी शनिवारी (१० फेब्रुवारी) दिली.

द असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया आणि नाशिक सर्जिकल सोसायटी यांच्यातर्फे त्र्यंबकरोडवरील दी डेमोक्रेसी हॉटेल्स ऍण्ड रिसॉर्टस् ऍण्ड कव्हेंशन सेंटर येथे आयोजित ‘मॅसिकॉन २०२४’ या राज्यस्तरीय परीषदेच्‍या औपचारीक उद्‌घाटन सोहळ्यात ते बोलत होते. ‘एएसआय’चे सचिव डॉ. प्रताप वरूटे, महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय कोलते, खजिनदार डॉ.नंदकिशोर कातोरे, परीषदेच्‍या आयोजन समितीचे सचिव डॉ.महेश मालु, मार्गदर्शक डॉ.प्रमोद शिंदे, अध्यक्ष डॉ.गोविंद कुलकर्णी, ‘एएसआय’चे डॉ.प्रताप विसपुते, उपाध्यक्ष डॉ.प्रविण सुर्यवंशी, डॉ.अजय पिंपळे, डॉ.समीर रेगे, डॉ.अंजली दवळे, डॉ. हर्षद महात्‍मे आदी उपस्‍थित होते.

डॉ.नियोगी म्‍हणाले, महाराष्ट्र शाखेतर्फे अतिशय सुयोग्‍य पद्धतीने परीषदेचे आयोजन केले आहे. येथे होणारी परीषद ही देशभरातील इतर शाखांसाठी आदर्शवत असते. विविध कौशल्‍यांवर चर्चा घडवितांना, या परीषदेनिमित्त डॉक्‍टर व रुग्‍ण यांच्‍या सुरक्षिततेसंदर्भात चर्चा घडविण्यात आली. वाढत्‍या तणावाच्‍या काळात डॉक्‍टरांनी छंद जोपासतांना तणावमुक्‍त राहाण्याचा सल्‍ला त्‍यांनी यावेळी दिला.

डॉ. महेश मालु म्‍हणाले, की गेल्‍या १ महिन्‍यापासून विविध समित्‍यांचे सदस्‍य परीषद यशस्‍वीतेसाठी अहोरात्र परीश्रम घेत आहेत. पीजीच्‍या विद्यार्थ्यांपासून डॉक्‍टरांचादेखील या परीषदेत चांगला सहभाग राहिला. पहिल्‍या दिवशी विविध विषयांवरील झालेल्‍या चर्चासत्रांमुळे वैद्यकीयच्‍या विद्यार्थी, सहभागी डॉक्‍टरांच्‍या ज्ञानात भर पडली आहे. काल शस्‍त्रक्रियांच्‍या प्रात्‍येक्षिकांवर आधारित कार्यशाळा झाली. यामध्ये तज्‍ज्ञ डॉक्‍टरांनी शस्‍त्रक्रियेतील बारकावे समजावून सांगितले.  

 ’एएसआय’च्या महाराष्ट्र शाखेच्‍या ४६ व्‍या वार्षिक परीषद मॅसिकॉन २०२४ चा समारोप रविवारी (११ फेब्रुवारी) होणार आहे. परीषदेनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन केले आहे. तसेच स्मरणिका व माहितीपत्र प्रकाशन करण्यात आले आहे.

उद्‌घाटन कार्यक्रमात डॉ.नियोगी यांचा परीचय डॉ.प्रमोद शिंदे यांनी केला. तर सूत्रसंचालन डॉ.शिल्‍पा दयानंद, डॉ.नेहा आहेर यांनी केला.

COMMENTS