आमदारकी मिळाली नाही आता आत्मक्लेश यात्रा काढा… राजू शेट्टींना सदाभाऊंचा खोचक सल्ला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदारकी मिळाली नाही आता आत्मक्लेश यात्रा काढा… राजू शेट्टींना सदाभाऊंचा खोचक सल्ला

नांदेड : प्रतिनिधीस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचं नाव राज्यपाल नियुक्त आमदारांच्या शिफारस यादीतून वगळण्यात आल्याने राजकारण चांगलेच

नेवासा येथील अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी भारतीय लहूजी सेनेचे उपोषण
पावसाने हिरावला दक्षिण आफ्रिकेचा विजय
नलिनीची मुक्तता आणि परिणाम! 

नांदेड : प्रतिनिधी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचं नाव राज्यपाल नियुक्त आमदारांच्या शिफारस यादीतून वगळण्यात आल्याने राजकारण चांगलेच तापले आहे. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आता त्यांनी काशी पर्यंत आत्मक्लेश यात्रा काढावी, अशी खिल्ली उडवली आहे.

नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत असताना खोत यांनी राजू शेट्टी यांना राज्यपाल नियुक्त आमदारकी न मिळाल्यामुळे चांगलाच हल्ला चढवला.

‘आमच्या वेळेस सरकारकडून भ्रमनिराश झाल्याचे सांगून राजू शेट्टी यांनी पाठिंबा काढून आत्मक्लेश यात्रा काढली होती.

आता माझी काशी झाली म्हणून त्यांनी काशीपर्यंत यात्रा काढावी’ असा टोला सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना लगावला.

तसंच, ‘आम्ही मागच्या वेळेस एनडीएसोबत आघाडी केली होती. तेव्हा राजू शेट्टी यांना दिलेला शब्द पाळला होता. तरीही राजू शेट्टी म्हणाले होते, या सरकारकडून माझा भ्रमनिराश झाला आणि त्यांनी आत्मक्लेश यात्रा काढली होती.

शेतकऱ्यांच्या नावाने पाठिंबा काढून घेतला होता. आता राज्यात अतिवृष्टी झाली. महापुरामुळे नुकसान झालं. पीक विमा मिळाला नाही दुधाला भाव नाही, एफआरपी मिळाला नाही मग आता भ्रमनिराश कसा झाला नाही, असा सवाल खोत यांनी राजू शेट्टींना विचारला.

‘राज्यपाल नियुक्त आमदारकी मिळणार अशी त्यांना आशा होती, पण आता त्यांचं नाव वगळण्यात आल्याचं कळतंय. त्यामुळे आता त्यांना आमदारकी मिळाली नाही त्यामुळे त्यांनी दुसऱ्यांदा आत्मक्लेश यात्रा काढावी.

मी त्यांच्याकडे गेलो आणि माझी काशी झाली म्हणून त्यांनी काशीपर्यंत यात्रा काढावी आणि काशीला जाऊन आंघोळ करावी, असा सल्लावजा टोलाही सदाभाऊ खोत यांनी लगावला.

COMMENTS