Homeताज्या बातम्याक्रीडा

पावसाने हिरावला दक्षिण आफ्रिकेचा विजय

पावसाच्या सातत्यपूर्ण व्यत्ययाने सोमवारी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा विजय हिरावून घेतला. सामना अर्धवट राहिल्याने दोन्ह

खेलो इंडिया यूथ गेम्स; आर्चरीमध्ये आदितीचा सुवर्णवेध तर पार्थ कोरडेला रौप्यपदक
टी -२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा… धोनीचाही महत्वाचा ‘रोल’
निसर्गानुभव कार्यक्रमात निसर्गप्रेमींना 374 वन्यप्राण्यांचे दर्शन

पावसाच्या सातत्यपूर्ण व्यत्ययाने सोमवारी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा विजय हिरावून घेतला. सामना अर्धवट राहिल्याने दोन्ही संघांना एक गुण बहाल करण्यात आला. डकवर्थ-लुईस-स्टर्न समीकरणानुसार दक्षिण आफ्रिका खूप पुढे होते. पण, निर्णयासाठी दोन्ही संघांनी किमान पाच षटके खेळणे अपेक्षित असते. दक्षिण आफ्रिकेच्या डावातील केवळ तीन षटकेच पूर्ण झाली होती. गटात दुबळय़ा असणाऱ्या झिम्बाब्वेला यामुळे किमान आपले गुणांचे खाते उघडता आले. पावसाच्या सुरुवातीच्या व्यत्ययानंतर सामना ९ षटकांचा करण्यात आला होता. या ९ षटकांत झिम्बाब्वेने ५ बाद ७९ धावा केल्या. त्यानंतर पावसाच्या पुन्हा आलेल्या व्यत्ययामुळे दक्षिण आफ्रिकेसमोर ७ षटकांत ६४ धावांचे सुधारित आव्हान ठेवण्यात आले. क्विंटन डीकॉक नावाचे वादळ झिम्बाब्वेच्या गोलंदाजीवर बरसले. पहिल्याच षटकात डीकॉकने २२, दुसऱ्या षटकांत १६ धावा कुटल्या. दक्षिण आफ्रिकेला झटपट विजय खुणावत होता. पण, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. पावसाने पुन्हा आपली खेळी सुरू केली आणि पुढे खेळ होऊच शकला नाही

.

COMMENTS