Homeताज्या बातम्यामनोरंजन

आई कुठे काय करते’ या मालिकेतील अभिनेत्री राधिका देशपांडेने नवीन बिझनेस सुरू

राधिकाला तिच्या देविकाच्या भूमिकेसाठी प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे. यातील तिच्या अभिनयाचे कौतुक केले जात आहे. अभिनयासोबतच ती एक उत्तम लेखिका आणि

आमदार अपात्रतेचा लवकर फैसला करावा
सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक शिक्षक… पहा लोकन्यूज २४ वर
व्हाट्सअँप ला स्टेटस ठेवून शिक्षकाची आत्महत्या

राधिकाला तिच्या देविकाच्या भूमिकेसाठी प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे. यातील तिच्या अभिनयाचे कौतुक केले जात आहे. अभिनयासोबतच ती एक उत्तम लेखिका आणि दिग्दर्शक देखील आहे. ‘होणार सून मी या घरची’, ‘स्वराज रक्षक संभाजी’, ‘लक्ष्य’ सारख्या अनेक मालिकेत तिने काम केले आहे.

कलाक्षेत्रात असे अनेक कलाकार आहेत जे अभिनयासोबत एक उत्तम बिझनेससुद्धा करतात. या यादीत आता ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अभिनेत्री राधिका देशपांडे सामील झाली आहे. मालिकेत राधिका अरूंधतीची खास मैत्रिण देविकाची भूमिका साकारताना दिसते. आता राधिकाने नवीन बिझनेस सुरू केला असून याची माहिती तिने सोशल मीडियावर सांगितली आहे.

https://www.instagram.com/radhika_deshpande/?utm_source=ig_embed&ig_rid=368c1cd9-8945-4804-b598-34b8fbf3dfb5

राधिकाने या संबंधित अनेक पोस्ट तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर केल्या आहेत. ती ‘राधिका क्रिएशन’ सोबतच ‘Twiosintl’ या ब्रॅंडची संस्थापक असून याचं नावाने इन्स्टाग्राम अकाऊंट देखील आहे. या अकाऊंटवर तुम्ही या ब्रॅंडमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश आहे ते पाहू शकता. राधिकाने ‘राधिका क्रिएशन’ या नावाची नवीन अॅक्टिंगची स्कूल सुरू केली आहे. या शाळेच्या माध्यमातून लहानमुलांना अभिनयाचे प्रशिक्षण देण्यात येईल. तसंच या मुलांना घेऊन काही प्रयोग देखील सादर केले जातील.

COMMENTS