अशोक कारखान्यावर माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे ३५ वर्षीची सत्ता कायम

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अशोक कारखान्यावर माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे ३५ वर्षीची सत्ता कायम

श्रीरामपूर-: श्रीरामपूर तालुक्याची ओळख असलेले अशोक सहकारी साखर कारखान्याच्या प्रचंड गाजलेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा अशोक कारखान्याच्या सभासदांनी ८२ व

कोपरगावात दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाहणी सुरू करा
शिर्डीत साई परिक्रमा भक्तिमय वातावरणात उत्साहात
एक लाख रुपये न दिल्यास अश्‍लिल फोटो व्हायरल करेल

श्रीरामपूर-: श्रीरामपूर तालुक्याची ओळख असलेले अशोक सहकारी साखर कारखान्याच्या प्रचंड गाजलेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा अशोक कारखान्याच्या सभासदांनी ८२ वर्षांचे पाणीदार नेतृत्व म्हणून ओळखल्या गेलेल्या अशोकची एकहाती यंत्रणा साभाळणाèया लोकनेते माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्याच बाजुने कौल दिल्याचे मतमोजणीतून स्पष्ट दिसुन आले त्यांच्या सून डॉ.वंदना मुरकुटे या ४९० मतानी पराभुत झाल्या इतर उमेदवार १८०० ते २००० मतानी पराभूत झाले.    मतमोजणीनंतर टाकळीभान गटातुन पराभूत झालेल्या डॉ.वंदना मुरकुटे व विष्णुपंत खंडागळे यांनी दिलेला फेरमतमोजणीचा अर्ज निवडणुक अधिकारी गणेश पुरी यांनी निकाली काढला.   मतमोजणीतच माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या लोकसेवा विकास आघाडीचे उमेदवार १८०० ते२००० मतांनी निवडून आले. त्यामुळे अशोक कारखान्याच्या सभासदांनी विरोधी शेतकरी संघटनेच्या पॅनलला पुन्हा एकदा नाकारले. कारखाना ८२ वर्षाचे भानुदास मुरकुटेच व्यवस्थित चालवू शकतात हाच मतदान करुन अशोकच्या सभासदांनी लोकसेवा विकास आघाडीलाङ्कविजयीकौल देत आपला विश्वास दाखविला. आज सकाळी श्रीरामपुरातचोख बंदोबस्तात अशोक कारखाना निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली.यावेळी माजी आमदार भानुदास मुरकुटे सकाळपासुन केंद्रामध्ये ठाणमाडुन होते. विरोधी गटाचे डॉ.वंदना मुरकुटे,ज्ञानेश्वर मुरकुटे,शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, जितेद्र भोसले उपस्थित होते.अविनाश आदिक गटाचे प्रमुख उपस्थित नव्हते .उपनगराध्यक्ष करण ससाणे, साई सस्थाचे विश्वस्त सचिन गुजर, माजी नगरसेवक संजय छल्लारे, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी आदि उपस्थित होते.     एकंदरच अशोक सहकारी साखर कारखान्याची निवडणूक यावेळी तांत्रिक मुद्दे उपस्थित करत प्रचंड गाजली. मा.आ. भानुदास मुरकुटे यांनी स्वतःच्या नेतृत्वाखालीच ज्येष्ठांना उमेदवारी देत व निष्ठावंत कार्यकत्र्यांना उमेदवार देवून लोकसेवा विकास आघाडीचे स्थानिक वजन असलेल्या उमेदवारांचे पॅनल दिले. त्यातच स्वत:भानुदास काशिनाथ मुरकुटे यांनी श्रीरामपूर तालुक्याचे राजकीय दृष्टयाप्रमुख गाव म्हणून ओळखल्या गेलेल्या टाकळीभान गटातून उमेदवारी केली. विरोधकांनी भानुदास मुरकुटे यांच्या विरोधात उमेदवार अभ्यासू अथवा तांत्रिक ज्ञान असणारा देण्याऐवजी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या सुनबाई सौ.वंदना ज्ञानेश्वर मुरकुटे यांनाच टाकळीभान गटातुन रिंगणात उतरविले. त्यामुळे येथे काट्याची टक्कर होईल असा अंदाज विराधंकानी बाधला .मुरकुटे यांना कॉगे्रसच्या एका गटाची म्हणजेच करण ससाणे,सचिन गुजर  यांनी निवडणुकीत पाठिंबा देत प्रत्यक्ष प्रचारात सहभागी होवून साथ दिली. तर कॉग्रसेचा दुसरा गट तसेच आमदार लहु कानडे समर्थक अरुण पा.नाईक,इंद्रनाथ पा.थोरात यांनी विरोधी शेतकरी संघटनेच्या पॅनलला साथ केली तर राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक व नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी सर्व प्रचार सभा सांभाळत स्वत: उमेदवार नसतानाही शेतकरी संघटनेच्या पॅनलला साथ दिली. शेतकरी पॅनलचे प्रमुख अ‍ॅड. अजित काळे यांनी सुरुवातीपासुनच अशोक कारखाना निवडणूकती दमदार पॅनल देण्यासाठी भुमिका घेतली .त्यांना कॉग्रेसचे आमदार कानडे गट व श्रीरामपूर तालुक्यातील विखे गट जवळ करता आला नाही.तर  श्रीरामपूर तालुक्यातील विखे गटाच्या दिपक पटारे सह काही प्रमुख कार्यकत्र्यानी मतदानाच्या दिवशी मुरकुटेंच्या बाजुने मुरकुटेच्या उमेदवारांसाठी काम केले. प्रचारापासून व आरोप प्रत्यारोपापासून हा गट अलिप्त राहिला.तर शिवसेनेचा काही प्रमुख कार्यकत्र्यानी मुरकुटेंच्या गटाला साथ दिली. अशोक कारखान्याच्या निवडणुकीत सासरा सुन यांच्यातील आरोप प्रत्यारोप खुपच खालच्या पातळीला गेले. त्यात माजी आमदार मुरकुटे यांच्या जगण्याविषयीच वक्तव्य झाल्याने त्याची मोठी सहानुभूती सभासदांमध्ये पसरली. कारण आपल्याच नात्यातील माणसाविषयी मृत्यूविषयी वक्तव्य करणारे कोणाचे होणार?असा सवाल मुरकुटे समर्थकानी जाहीर प्रचार सभातून केला. निवडणुक आधिकारी गणेश पुरी  यांनी मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडली.पोलिस निरीक्षक संजय सानप, व त्यांच्यासहकाèयांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मुरकुटे यांच्या कार्यकेर्ते यांनी मतदान केंद्रा बाहेर जल्लोष केला.मुरकुटे यांचे चिरजिव सिध्दार्थ मुरकुटे व त्यांचा नातु निरज मुरकुटे यांना कार्यकर्तेनी जल्लोषात सहभागी केले.

COMMENTS