नवोदय विद्यालयात आढळले आणखी 12 कोरोना बाधीत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवोदय विद्यालयात आढळले आणखी 12 कोरोना बाधीत

अहमदनगर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्‍वर येथील जवाहर नवोदय विद्यालय आता देशात चर्चेला आले आहे. एकीकडे राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत

वृक्ष वेद फाउंडेशन व वृक्षमित्र संघटनेच्या वतीने वृक्षारोपण
गोळीबाराने कर्जत प्रांत कार्यालय हादरले
पोलिस असल्याचे भासवून वृद्ध महिलेला लुटले .

अहमदनगर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्‍वर येथील जवाहर नवोदय विद्यालय आता देशात चर्चेला आले आहे. एकीकडे राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना व जगभरात आता ओमायक्रॉन या नव्या विषाणूने थैमान घालण्यास सुरुवात केली असताना टाकळी ढोकेश्‍वरच्या जवाहर नवोदय विद्यालयात कोरोनाचे रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी सायंकाळी येथे आणखी 12 विद्यार्थी कोरोना बाधूत आढळून आले असून आता येथील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 83 झाली आहे. यामुळे पारनेर तालुक्यात अस्वस्थता पसरली आहे.
टाकळी ढोकेश्‍वर येथे जवाहर नवोदय विद्यालय हे निवासी विद्यालय आहे. येथे मागील शुक्रवारी (24 डिसेंबर) 9 कोरोनाबाधित विद्यार्थी आढळून आले होते. तर शनिवारी (25 डिसेंबर) आणखी 10 कोरोनाबाधित विद्यार्थी व शिक्षक आढळून आले. त्यानंतर रविवारी (26 डिसेंबर) सकाळी 33 व सायंकाळी 19 असे एकूण 52 कोरोना बाधित आढळून आल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर सोमवारी (27 डिसेंबर) सायंकाळी आणखी 12 विद्यार्थी कोरोना बाधित आढळून आले आहे. यामध्ये 8 विद्यार्थिनी व 4 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता नवोदय विद्यालयातील कोरोना बाधितांची संख्या 83 वर पोहोचली आहे. 483 जणांचे नमुने तपासणीसाठी आरोग्य विभागाच्यावतीने घेण्यात आले होते. दरम्यान, नवोदय विद्यालय समितीचे पुणे विभागाचे उपायुक्त लाड यांनी सोमवारी या विद्यालयास भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

त्या तपासणीला पाठवले
करोना बाधित अहवाल प्राप्त झाल्यानंतर खबरदारी म्हणून या विद्यालयातील विद्यार्थी व कर्मचार्‍यांच्या स्त्रावाचे नमुने ओमायक्रॉन या करोनाच्या नव्या व्हेरीएंटच्या तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत. प्रशासन सतर्क झाले असून पंधरा दिवसांसाठी हे विद्यालय प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहे. कोरोना बाधित संख्या वाढीमुळे विद्यार्थी व शिक्षक धास्तावले आहेत. टाकळी ढोकेश्‍वर विद्यालयात बाधीत विद्यार्थी वाढत आसल्याने पालक वर्ग चिंतेत आहे. तर प्रशासनाच्यावतीने सर्वांची प्रकृती चांगली असल्याचे कळवले जात आहे. मात्र, नवोदय विद्यालयाच्या घटनेने पारनेर तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

COMMENTS