Homeमहाराष्ट्रअहमदनगर

राहुरीत रेल्वे अपघातात तरुणाचा मृत्यू

देवळाली प्रवरा : राहुरी रेल्वे स्थानक परिसरात शनिवारी सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास झालेल्या रेल्वे अपघातात ४६ वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्

कोतुळ पूल गेला पाण्याखाली ! l पहा LokNews24 —————
शिवाजीराव लावरे यांनी स्वीकारला प्राचार्यपदाचा कार्यभार
चंद्रकांत पाटलांनी तात्काळ आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा

देवळाली प्रवरा : राहुरी रेल्वे स्थानक परिसरात शनिवारी सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास झालेल्या रेल्वे अपघातात ४६ वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तांदूळवाडी (ता. राहुरी) येथील दत्तात्रय अंबादास चव्हाण (वय ४६) असे मृत इसमाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय चव्हाण हे रेल्वे लाईनवरून चालत असताना मोबाईल फोनवर बोलत होते. याच वेळी दोन्ही बाजूंनी रेल्वेगाड्या येत असल्याने त्यांचा अंदाज चुकला. एका बाजूने येणाऱ्या वेगवान रेल्वेगाडीने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांच्या शरीराचे तुकडे होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. राहुरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. पुढील तपास सुरू असून ही घटना अपघाती मृत्यू म्हणून नोंदविण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे तांदूळवाडी परिसरासह राहुरी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

COMMENTS