Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चंद्रकांत पाटलांनी तात्काळ आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा

कोपरगावात महविकास आघाडीने निषेध व्यक्त करून केली मागणी

कोपरगाव प्रतिनिधी : कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेली रयत शिक्षण संस्था आशिया खंडात सर्वात मोठी नवाजलेली संस्था असून ही संस्था भिकेच्या प

चंद्रकांतदादांची क्षमता पैशात मोजता येणार नाही… त्यांनी राज्यात १०५ आमदार निवडून आणले…
महात्मा फुले, आंबेडकरांनी भीक मागून शाळा सुरू केल्या
चंद्रकांत पाटलांमुळे राज्याचं मनोरंजन होतंय… त्यांच्यावर करमणूक कर लावा

कोपरगाव प्रतिनिधी : कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेली रयत शिक्षण संस्था आशिया खंडात सर्वात मोठी नवाजलेली संस्था असून ही संस्था भिकेच्या पैशावर मोठी झाली आहे का?असा सवाल उपस्थित करून बेजबाबदार वक्तव्य करणार्‍या भाजपच्या नेत्यांच्या विचारांची कीव येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अपमान करणार्‍या उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ राजीनामा द्यावा असे माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे यांनी म्हंटले आहे.


उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर महाविकास आघाडीच्या वतीने हाताला काळया पट्ट्या बांधून निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी पद्माकांत कुदळे बोलत होते.ते पुढे म्हणाले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना ब्रिटिशांनी कायदे कमिटीचा प्रमुख नेमण्याची तयारी दर्शवून पाहिजे तो पगार देणार होते. मात्र त्यांनी तो पगार नाकारून आपल्या शिक्षणाचा फायदा समाज उद्धारासाठी केला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणासाठी विशेषतः महिलांच्या शिक्षणासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावले.ज्यावेळी टाटा ग्रुपचे वार्षिक उत्पन्न बारा हजार होते त्यावेळी ज्योतिबा फुले यांचे वार्षिक उत्पन्न बारा लाख होते. त्यांनी मोठे प्रकल्प मार्गी लावून हा पैसा बहुजनांच्या शिक्षणासाठी वापरला.या व्यक्ती कुणाकडेही भीक मागायला गेल्या नाही.केवळ मागितलेल्या अनुदानास भीक असे म्हटले जात असेल तर मंत्री चंद्रकांत पाटील मंत्री म्हणून सरकारकडून जे मानधन घेतात ते घेवू नये ती देखील भीक आहे असे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे म्हणाले की, भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने महापुरुषांचा अपमान केला जात आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बाबत उच्च तंत्र शिक्षणमंत्री यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्या विचारांची दिवाळखोरी दिसून येते.  शैक्षणिक क्षेत्रात काम करतांना समाजासाठी लोकसहभागातून शिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी घेतलेल्या मदतीला भीक म्हणून संबोधने हे चुकीचे आहे.देशात व राज्यात  वाढलेली महागाई व बेरोजगारी अशा ज्वलंत प्रश्‍नावरून जनतेचे लक्ष हटविण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले,शिवसेनेचे कलविंदरसिंग डडियाल,चंद्रशेखर म्हस्के,जावेद शेख यांनी देखील मनोगत व्यक्त करून निषेध नोंदविला. यावेळी पद्माकांत कुदळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगूले, शिवसेना शहराध्यक्ष कलविंदरसिंग डडीयाल, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरवके, मंदार पहाडे, रमेश गवळी, दिनकर खरे, राजेंद्र वाकचौरे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, चंद्रशेखर म्हस्के, जावेद शेख, प्रकाश दुशिंग, वाल्मिक लहिरे, संदीप कपिले, सुनील बोरा, राजेंद्र जोशी, अंबादास वडांगळे, इम्तियाज अत्तार, रहेमान कुरेशी, शुभम लासुरे, किरण बागुल, आकाश गायकवाड, बाबुराव पवार, बाळासाहेब सोनटक्के, बाळासाहेब पांढरे, अक्षय पवार, नितीन शेलार, रोशन शेजवळ, सिद्धेश होले, दिनेश संत, अनिरुद्ध काळे आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS