यवतमाळ ‘ती’ बस नाल्यातून बाहेर, चालकासह चौघांचा मृत्यू

Homeताज्या बातम्या

यवतमाळ ‘ती’ बस नाल्यातून बाहेर, चालकासह चौघांचा मृत्यू

यवतमाळ : उमरखेडच्या दहागावात मुसळधार पावसात मंगळवारी एसटी बस नाल्याच्या पाण्यात वाहून गेली होती. गाळात अडकलेली ती बस आज नाल्यातून बाहेर काढण्यात यश आ

कर्जतच्या ’तहसील’मध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेशाची पायमल्ली
पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या
तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री पाय घसरून पडले

यवतमाळ : उमरखेडच्या दहागावात मुसळधार पावसात मंगळवारी एसटी बस नाल्याच्या पाण्यात वाहून गेली होती. गाळात अडकलेली ती बस आज नाल्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे. शिवाय या दुर्घटनेत बस चालकासह चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

नागपूरहून नांदेडकडे जाणारी (MH 14 BT 5018) ही हिरकणी बस मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसामुळे पाण्यात वाहून गेली होती. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरापासून काही अंतरावरील दहागाव नाल्यावर ही दुर्घटना घडली. मुसळधार पावसामुळे काल रात्री शोधकार्य थांबवले होते. आज, बुधवार सकाळपासून पुन्हा शोध मोहीम सुरू केले. दरम्यान एसटी बसमधील बेपत्ता असलेला एक मृतदेह नाल्यापासून दीड किलोमीटर अंतरावर बचाव पथकाला आढळला. हा मृतदेह बस चालकाचा असल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत काल तीन व्यक्ती मृत झाल्या होत्या. या अपघातात दोन प्रवाशांना वाचवण्यात यश आले होते तर कालच तिघांचे मृतदेह हाती लागले होते. यातील चालकाचा शोध सुरू होता.

प्रवाशांच्या मृत्यूची जबाबदारी सरकार घेईल : सतेज पाटील

दरम्यान ज्या प्रवाशांचा मृत्यू झाला त्याची सरकार जबाबदारी घेईल. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करून पाण्यात बस घालू नये, अशा वाहन चालकांना सक्त सूचना देण्यात येतील आणि यामध्ये चूक कोणाची आहे याची चौकशी केली जाईल, असे आश्वासन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिले होते.

COMMENTS