मेहुलभाई  देशातून पळाला कसा ? – नवाब मलिक

Homeताज्या बातम्या

मेहुलभाई देशातून पळाला कसा ? – नवाब मलिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी मेहुलभाई... मेहुलभाई बोलत होते. मग मेहुलभाई देशातून पळाला कसा ?अशी खोचक विचारणा करतानाच जेवढी तत्परता आणण्यासाठी दाखवताय तेवढीच तत्परता मेहुलभाई पळून जाताना का दाखवण्यात आली नाही, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला केला आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान पारगाव सिरस येथे उत्साहात संपन्ननागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो लाभार्थ्यांना विविध शासकीय प्रमाणपत्रांचे वितरण
पदाधिकार्‍यांचा कार्यकाल संपल्यानंतर मंत्री जयंत पाटील 5 वर्षाने इस्लामपूर पालिकेत
अकासा एअर आणि इंडिगो फ्लाइटमध्ये बॉम्बची अफवा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी मेहुलभाई… मेहुलभाई बोलत होते. मग मेहुलभाई देशातून पळाला कसा ?अशी खोचक विचारणा करतानाच जेवढी तत्परता आणण्यासाठी दाखवताय तेवढीच तत्परता मेहुलभाई पळून जाताना का दाखवण्यात आली नाही, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला केला आहे. 

मेहुल चोक्सी यांना भारतात आणताय चांगली बातमी आहे. परंतु दोन तीन दिवस मेहुल चोक्सी यांना आणण्याचा जोरदार प्रचारही केंद्र सरकारकडून केला जातोय याबाबत मलिक यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.मेहुल चोक्सी यांना आणताय ठिक आहे. परंतु, नीरव मोदी… विजय मल्ल्या… यांना कधी आणणार आहात. जनतेचा पैसा बुडवून देशातून पळून जाणार्‍यांची मोठी तुकडी कार्यरत आहे, असेही मलिक म्हणाले.मेहुल चोक्सीला आणण्याचा प्रश्न नाही तर तो पळाला कसा हा खरा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे आणि जनता आता उपस्थित करत आहे. देशातील जनतेचा पैसा बुडवून पळत असताना का तत्परता मोदींनी दाखवली नाही असा प्रश्न आजही जनतेच्या मनात जिवंत असल्याचे मलिक यांनी सांगितले.

COMMENTS