Homeताज्या बातम्या

मुंबई, पुणे व नागपूरातील कार्यालयांना स्फोटाची धमकीमहापौर कार्यालयासह आरएसएसच्या मुख्यालयाचा समावेश

पुणे : मुंबई, पुणे, नागपूर तसेच गुजरातमधील अहमदाबाद आणि गांधीनगर येथील काही महत्त्वाच्या शासकीय व सार्वजनिक ठिकाणांना स्फोट घडवून आणण्याची धमकी द

राष्ट्रीय महामार्गावर चार रानडुकरांचा मृत्यू; अपघात की शिकार? चर्चांना उधाणदोन मृतदेह गायब, उर्वरित दोन सडल्याने दुर्गंधी; वन विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला मुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद; कार सोडून देवेंद्र फडणवीस थेट दुचाकीवरून निवासस्थानाकडे रवाना!
कुंभमेळ्यातील 2270 कोटींच्या निविदाप्रकरणी 4 टक्के कुणी कुणाला दिले? ऐका हा गौप्यस्फोट!
Municipal Corporation : मुंबई-पुणे महापौर कार्यालयांसह नागपूरच्या संघ  मुख्यालयाला बॉम्बची धमकी? भर दिवसा संपूर्ण मुख्य इमारत तातडीने रिकामी ...


पुणे : मुंबई, पुणे, नागपूर तसेच गुजरातमधील अहमदाबाद आणि गांधीनगर येथील काही महत्त्वाच्या शासकीय व सार्वजनिक ठिकाणांना स्फोट घडवून आणण्याची धमकी देणारे संदेश प्राप्त झाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या संदेशांमध्ये काही ठिकाणी स्फोटकांच्या सहाय्याने हल्ला करण्याचा इशारा देण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून, त्यानंतर संबंधित परिसरात सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
माहितीनुसार, मुंबई आणि पुणे येथील महापौर कार्यालयांसह नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय यासह काही संवेदनशील स्थळांना लक्ष्य करण्याचा उल्लेख धमकीच्या संदेशात करण्यात आला आहे. तसेच काही विशिष्ट वेळा आणि कालावधी नमूद करून संभाव्य घातपाताचा इशाराही देण्यात आला आहे. या संदेशांमुळे प्रशासन आणि पोलिस यंत्रणांनी तातडीने खबरदारीची पावले उचलली आहेत. धमकीच्या संदेशामध्ये काही ऐतिहासिक आणि राजकीय घटनांचा उल्लेख करून विशिष्ट संघटनांविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली आहे. तसेच काही व्यक्तींची नावेही संदेशाच्या शेवटी नमूद करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. तथापि, या दाव्यांची सत्यता अद्याप तपासाअंती स्पष्ट होणे बाकी आहे. धमकी मिळाल्यानंतर पुणे पोलिस, स्फोटक शोधक व नाशक पथक तसेच संगणकीय गुन्हे अन्वेषण विभागाने तपास सुरू केला आहे. संदेश नेमका कुठून पाठविण्यात आला, त्यामागील व्यक्ती किंवा गट कोणता आहे आणि हा प्रकार प्रत्यक्ष धोका आहे की केवळ भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, याचा शोध घेतला जात आहे.

COMMENTS