पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातात तिघांचा मृत्यू

Homeताज्या बातम्या

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातात तिघांचा मृत्यू

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटजवळ सोमवारी सकाळी सहा वाहने एकमेकांवर आदळली. तीन कार, एक खासगी बस, एक टेम्पो आणि एक ट्रेलर अपघातात होते

समृद्धीवर दोन जणांचा होरपळून मृत्यू ; अपघातानंतर कारने घेतला पेट
Solapur : बनावट डिझेल विक्री करणारी टोळी जेरबंद (Video)
LokNews24 l देशाच्या लोकशाहीवर प्रधानमंत्री मोदींचा घाला ; मोदींचे फंडे आणि जूमले फक्त निवडणुकीपुरते

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटजवळ सोमवारी सकाळी सहा वाहने एकमेकांवर आदळली. तीन कार, एक खासगी बस, एक टेम्पो आणि एक ट्रेलर अपघातात होते. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आणि सहा जण जखमी झाले. जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, दोघांची प्रकृती गंभीर आहे. ताज्या माहितीनुसार, अपघातानंतर पुणे ते मुंबई हा रस्ता पूर्णपणे बाधित झाला आहे. यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. मृतांमध्ये असलेले तिघेही कारमध्ये होते. मिळालेल्या माहितीनुसार, एक कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कोंबड्यांनी भरलेल्या ट्रकशी प्रथम धडकली. यानंतर मागून येणारा एक भरधाव ट्रेलर कारला धडकला. यामुळे कार पूर्णपणे चेंदामेंदा झाली. कारमधील अडकलेले दोन्ही मृतदेह काढण्यात आले असून पुढील प्रक्रीयेकरीता खोपोली नगरपालिका रुग्णालयात पाठवण्यात आले.

COMMENTS