धक्कादायक… कोरोनामुळे जगभरात ४५ लाख जण पडले मृत्युमुखी

Homeविदेश

धक्कादायक… कोरोनामुळे जगभरात ४५ लाख जण पडले मृत्युमुखी

वेब टीम : दिल्ली गेल्या दीड वर्षांपासून कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला कवेत घेतले आहे. जगभरातील कोरोना रुग्णसंख्या 22 कोटी 48 हजार 243 वर पोहोच

बीएसएनएल बंद करणार नाही व खासगीकरणही नाही ; केंद्रीय राज्यमंत्री धोत्रे यांची ग्वाही
कर्जमाफीच्या अटींविरोधात किसान सभेचे राज्यभर तीव्र आंदोलन; आज पुणे येथे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांना देणार निवेदन
अरुण गवळीला सर्वोच्च दिलासा नाहीच

वेब टीम : दिल्ली

गेल्या दीड वर्षांपासून कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला कवेत घेतले आहे. जगभरातील कोरोना रुग्णसंख्या 22 कोटी 48 हजार 243 वर पोहोचली आहे.

त्यापैकी, 19 कोटी 67 लाख 14 हजार 138 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर, 45 लाख 58 हजार 572 रुग्णांना प्राण गमवावे लागले आहे.

जगभरात सध्या 1 कोटी 87 लाख 76 हजार 533 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी, 1 लाख 5 हजार 693 रुग्ण गंभीर आहेत.

जगात सर्वाधिक 4 कोटी 5 लाख 13 हजार 18 रुग्ण अमेरिकेत आढळून आले आहेत.

सर्वाधिक 6 लाख 62 हजार 853 मृत्यू अमेरिकेतच झाले आहेत. रुग्णसंख्येत भारत दुसर्‍या स्थानावर आहे. त्यानंतर ब्राझिलचा क्रमांक लागतो.

COMMENTS