खेळाडूंचे प्राधान्याने लसीकरण करावे : पी टी उषा

Homeताज्या बातम्या

खेळाडूंचे प्राधान्याने लसीकरण करावे : पी टी उषा

प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत खेळाडूंच्या लसीकरण अभियानासंदर्भात प्रथितयश ऑलिम्पिक खेळाडू पी टी उषा यांनी केंद्र सरकार आणि केरळ सरकारला विशेष विनंती केली.

कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या ३८ हजार ग्राहकांना नोटिस
आगीत दोन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू
चांदबिबी महालच्या परिसरात पुन्हा आढळला बिबट्याचा वावर

नवी दिल्ली : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत खेळाडूंच्या लसीकरण अभियानासंदर्भात प्रथितयश ऑलिम्पिक खेळाडू पी टी उषा यांनी केंद्र सरकार आणि केरळ सरकारला विशेष विनंती केली. ट्वीटरद्वारे आपली चिंता व्यक्त करताना पी टी उषा म्हणाल्या, ” तातडीचे : केरळच्या सरकारला-मुख्यमंत्र्यांना तसेच केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री किरेन रिजिजू यांना नम्र विनंती आहे की, आगामी राष्ट्रीय आणि इतर स्पर्धांमध्ये भाग घेणारे खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक सहकारी,सहायक आणि वैद्यकीय चमूचे प्राधान्याने लसीकरण करावे. आपण क्रीडा विभागास दुर्लक्षित ठेवूच शकत नाही. 

COMMENTS