मोठी घडामोड… शिवसेनेचे शहरप्रमुख गेले थेट शरद पवारांच्या भेटीला

Homeमहाराष्ट्र

मोठी घडामोड… शिवसेनेचे शहरप्रमुख गेले थेट शरद पवारांच्या भेटीला

अहमदनगर : प्रतिनिधी नगर शहर शिवसेनाप्रमुख दिलीप सातुपते यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांची भेट घेतली. या भेटीमध्ये विविध वि

वृद्धाच्या खून प्रकरणाची उकल करण्यात पोलिसांना यश
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविणे गरजेचे- रणजीतसिंह डिसले
नामांतर नव्हे, विकासाची गरज ओळखा! जामखेड तालुक्याच्या नामांतराच्या मागणीनंतर नागरिकांचा सूर

अहमदनगर : प्रतिनिधी

नगर शहर शिवसेनाप्रमुख दिलीप सातुपते यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांची भेट घेतली. या भेटीमध्ये विविध विषयावर चर्चा झाली. मात्र,  या भेटीने शहरात राजकीय चर्चेला उधान आले आहे. राजकीय वातावरण चांगलेच ढवळुन निघाले आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे शनिवारी नगर दौर्‍यांवर येत असताना एक दिवस आधी शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी पुण्यात  पवारांची सदिच्छा भेट घेतली. तब्बल चाळीस मिनिटांच्या या भेटीत पवार यांनी नगर जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा केली.

केडगावचा रहिवासी असल्याने पवारांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबतही सविस्तर माहिती घेतल्याचे सातपुते यांनी सांगितले. सातपुते यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षांची विशेष भेट घेवून चर्चा केल्याने शहरातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. 

COMMENTS