डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची वास्तू स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देण्याची मागणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची वास्तू स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देण्याची मागणी

अहमदनगर - प्रतिनिधी नगर शहरामध्ये आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी केलेल्या मोठ्या संघर्षानंतर महानगरपालिकेने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स

लॉटरीतून मिळणार गरीब मुलांना मोफत शाळा प्रवेश
पत्रकार वारीशे यांच्या हत्येचा राहुरी पत्रकार परिषदेने केला निषेध
कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे नगर-मनमाड रोडवर रास्ता रोको

अहमदनगर – प्रतिनिधी

नगर शहरामध्ये आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी केलेल्या मोठ्या संघर्षानंतर महानगरपालिकेने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक ही वास्तू शहरातील टिळक रोड येथे उभारली असून या स्मारकाच्या उभारणीचा मुख्य उद्देश म्हणजे मागासवर्गीय समाजाला विद्यार्थ्यांकरिता विविध स्पर्धात्मक परीक्षांकरिता यूपीएससी, एमपीएससी परीक्षा, मार्गदर्शन केंद्र, विद्यार्थी स्टडी रूम, आद्यवत ग्रंथालय, सांस्कृतिक केंद्र, विद्यार्थी वस्तीगृह हा होता परंतु या मूळ उद्देशापासून दूर राहून या ठिकाणी लग्न समारंभ इत्यादीसाठी वास्तूचा वापर महानगरपालिकेने केला आहे. 

सध्या ही वास्तू अतिशय अडगळीत पडलेली आहे. त्याठिकाणी शेजारील व्यावसायिक आपल्या बांधकामाचे साहित्य ठेवण्यासाठी याचा अनधिकृतपणे वापर करीत आहे. वास्तूची अवस्था देखील दयनीय झाली आहे. तरी आपण शहरातील बहुजन शिक्षण संघ या मागासवर्गीय, आदिवासी, भटके विमुक्त जाती जमाती, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरिता कार्यरत असलेल्या बहुजन शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा परीक्षा करिता (युपीएससी-एमपीएससी व तत्सम परीक्षा) मार्गदर्शन केंद्र, विद्यार्थी स्टडी रूम, अद्ययावत ग्रंथालय, सांस्कृतिक केंद्र, विद्यार्थी वसतिगृह स्थापन करणेकरिता सदर वस्तू भाड्याने मिळावी या मागणीचे निवेदन आंबेडकरवादी सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, संस्था या सर्वांनी मागणी केली आहे. 

बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या हिताकरिता ही वास्तू बहुजन शिक्षण संघ या संस्थेस आपण प्रशासकीय बाबींची पूर्तता करून अटी व शर्तींसह कराराने देण्यात यावी अशी मागणी आ संग्रामभैया जगताप यांना निवेदन देऊन आंबेडकरी चळवळीच्यावतीने मागणी करण्यात आली याप्रसंगी आर पी आय (आठवले) राज्य सचिव अजय साळवे, बहुजन शिक्षण संघाचे कार्यकारी रजिस्टार प्रा. बैचे, प्रा भिमराव पगारे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड, आर पी आय (गवई) शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, आर पी आय (आठवले) युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, आर पी आय (आंबेडकर) शहराध्यक्ष संदीप वाघमारे, ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश थोरात, पी आर पीचे ज्येष्ठनेते नितीन कसबेकर, संतोष पाडळे, किरण जाधव, अक्षय बोरुडे, बंटी पारधे, प्रकाश कांबळे यांनी निवेदन देऊन मागणी केली तसेच महानगरपालिकेचे आयुक्त, महापौर, उपमहापौर यांनाही निवेदन पत्र देऊन मागणी करण्यात आली.

COMMENTS