Homeताज्या बातम्या

मिसिंग लिंक प्रकल्पाबाबतच्या अफवांवर भाजपने व्हिडिओ शेअर करत दिले थेट उत्तर, अतिवृष्टीमुळे आलेला मलबा प्रशासनाने अवघ्या काही वेळातच केला पूर्णपणे साफ!

https://youtu.be/0U5NqIhhdkA मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील महत्त्वाकांक्षी 'मिसिंग लिंक' प्रकल्पाबाबत सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांना भाजप महाराष्ट

महागाई, कर्जमाफीवरून अधिवेशन गाजणार !
उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा तात्पुरती स्थगित
पीक विम्यासाठी संभाजी ब्रिगेडचे महसूल मंडळ पाटोदा येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील महत्त्वाकांक्षी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाबाबत सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांना भाजप महाराष्ट्राने आता सडेतोड उत्तर दिले आहे. महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे या प्रकल्पाच्या एका बोगद्यासमोर दरड कोसळून काही मलबा जमा झाला होता. मात्र, प्रशासनाने तातडीने कारवाई करत हा मलबा आता पूर्णपणे हटवला आहे आणि बोगद्यासमोरील रस्ता स्वच्छ केला आहे. या संपूर्ण कामाचा आणि प्रगतीचा एक थेट व्हिडिओ देखील भाजपने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
जे विरोधक कालपर्यंत ‘मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण होणे शक्यच नाही’ असे म्हणत होते, तेच लोक आज या पावसामुळे केवळ राजकारण करण्यासाठी अफवा पसरवत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. विरोधकांच्या या टीकेला आणि अफवांना उत्तर देताना, प्रकल्पाचे काम अतिशय वेगाने आणि सातत्याने सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता तत्परतेने हा राडारोडा बाजूला केला असून, या प्रकल्पाच्या कामात कोणताही मोठा अडथळा आलेला नाही, हे आता समोर आले आहे. नागरिकांनी अशा कोणत्याही खोट्या दाव्यांवर आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही यादरम्यान करण्यात आले आहे.

COMMENTS