Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नेवासा तालुक्यात मोटारसायकल झाडावर आदळून तरुण ठार; नागेबाबा पतसंस्थेच्या कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू

अहिल्यानगर : येथील श्रीसंत नागेबाबा ग्रामीण पतसंस्थेचे कर्मचारी रामदास अर्जुन सुसे (वय २६) यांचा रविवारी रात्री झालेल्या मोटारसायकल अपघातात दुर्द

धोंडा खायला बोलावले नाही म्हणून वकील पत्नीस मारहाण; श्रीरामपूर शहर पोलिसांत तिघांवर गुन्हा दाखल
सुवर्णा शिंदे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी
दगड मारून सौरऊर्जा पंपाची पट्टी फोडली; खरवंडी कासार येथील घटना, शेतकरी चिंतेत
टोलनाक्यावर दुचाकी आदळून एक जागीच ठार

अहिल्यानगर : येथील श्रीसंत नागेबाबा ग्रामीण पतसंस्थेचे कर्मचारी रामदास अर्जुन सुसे (वय २६) यांचा रविवारी रात्री झालेल्या मोटारसायकल अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे भेंडा आणि गोंडेगाव परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नेवासा तालुक्यातील गोंडेगाव येथील रहिवासी असलेले रामदास सुसे हे भेंडा येथील श्रीसंत नागेबाबा ग्रामीण पतसंस्थेच्या शाखेत कार्यरत होते. रविवारी रात्री काम आटोपून ते भेंडा येथून मोटारसायकलवरून गोंडेगाव येथील आपल्या घरी जात होते. घरापासून काही अंतरावरच असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या लिंबाच्या झाडावर त्यांची मोटारसायकल जोरात धडकली.

या भीषण अपघातात ते गंभीर जखमी झाले. रात्री उशिरापर्यंत रामदास घरी न पोहोचल्याने काळजीपोटी कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोध घेत असताना रस्त्यावरील लिंबाच्या झाडाजवळ मोटारसायकलसह रामदास जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने नेवासा फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती; डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

COMMENTS