Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रेमविवाह केल्याने गुंडांकडून तरुणीला मारहाण

पुणे ः प्रेमविवाह केलेल्या एका 20 वर्षीय तरुणीला तिच्या घराजवळ राहणार्‍या टोळक्याने धारदार हत्याराने वार करुन जखमी करत तिला बेदम मारहाण केल्याचा

शिक्षक मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी घसरणार : सचिन झगडे
पंतप्रधान मोदींना फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान
स्वयंसहाय्यता गटातील महिलांच्या मुलांकरिता मोफत ई- लर्निग ॲप

पुणे ः प्रेमविवाह केलेल्या एका 20 वर्षीय तरुणीला तिच्या घराजवळ राहणार्‍या टोळक्याने धारदार हत्याराने वार करुन जखमी करत तिला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना येरवडा परिसरातील मच्छी मार्केट येथे 29 डिसेंबरला रात्री घडली. याप्रकरणी सराईत गुन्हेगार जय अ‍ॅथोनी, अनिकेत जगन्नाथ काकडे, गणेश जगताप, सोनु ऊर्फ रॅडो (सर्व रा.येरवडा,पुणे) या आरोपींवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली आहे.

याप्रकरणी तरुणीने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पायल हिने तीन महिन्यापूर्वी दत्ता ऊर्फ अनिकेत राजु साठे याच्याशी आंळंदी येथे जाऊन प्रेमविवाह केला. त्यामुळे तिच्या चाळीत राहणार्‍या आरोपींनी तिला ‘तु साठयाच्या पोराशी का लग्न केले, आता तुला सोडणार नाही’ असे म्हणून तिला जीवे ठार मारण्याची मारण्याची धमकी दिली. तसेच दरम्यान आरोपी जय अँथोनी याने त्याचे हातातील चमकणारे धारदार शस्त्राने तिच्या डोक्यात मारण्यासाठी हत्यार उगारले. परंतु या तरूणीने डाव्या हाताने तो वार अडविला असता, तिच्या डाव्या हातास लागुन जखम झाली आहे. तर इतर आरोपींनी तिचे केस ओढुन तिला लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन त्यांचेकडील हत्यार हवेत फिरवुन परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. याविरोधात जगन्नाथ तुकाराम काकडे (वय-55) यांनी ही येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

COMMENTS