Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिनचर्यामध्ये योगाचा समावेश केला पाहिजे ः योगगुरू थोरात

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः धावपळीच्या युगात माणसांची धावपळ चालू आहे.जीवनाचे उदिष्ट प्राप्त करायचे असेल, प्राप्त केलेल्या उदिष्टांचा जीवनात आनंद म

मनोरुग्ण मुलाची पालकांना अमानुष मारहाण, आईचा मृत्यू, l पहा LokNews24
बस प्रवासातच संपली इहलोकीची यात्रा…एसटीतील बेशुद्ध प्रवाशाचा मृत्यू
चौरंगीनाथ महाराजांच्या यात्रेचा श्रीफळ वाढवून शुभारंभ

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः धावपळीच्या युगात माणसांची धावपळ चालू आहे.जीवनाचे उदिष्ट प्राप्त करायचे असेल, प्राप्त केलेल्या उदिष्टांचा जीवनात आनंद मिळवायचा असेल तर माणसांची शरीरयष्टी व मानसिक आरोग्य चांगले असणे अतिशय महत्वाचे आहे. जीवनाचा आनंद मिळवायचा असेल तर दिनचर्यामध्ये योगाचा समावेश केला पाहिजे.असे योगगुरु किशोर थोरात यांनी योग दिनानिमित्त शहरवासीयांना केले आहे.
                  देवळाली प्रवरा नगर पालिकेने योग दिनानिमित्त योग शिबीर आयोजित केले होते.या शिबीरास योगगुरु किशोर थोरात यांनी मार्गदर्शन केले.त्यावेळी थोरात बोलत होते.यावेळी मुख्याधिकारी अजित निकत,सुदर्शन जवक, संभाजी वाळके, अमोल दातीर, दिनकर पवार, सुनील गोसावी, मनोजकुमार  पापडीवाल,कपिल भावसार, सुरेश चासकर,संतोष गाडेकर,गोरख भांगरे, रोहित पंडित, राजेंद्र कदम, अरुण कदम, भारत साळुंखे, नंदू शिरसाठ, सुदाम कडू, अमोल कांबळे व नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी, नागरीक  उपस्थित होते. यावेळी योगगुरु किशोर थोरात यांनी योग साधना मनुष्य जीवनात किती महत्वाची आहे.हे पटवून दिले.धावपळीच्या युगात अनेक माणसे पैसा व संपत्ती कमवतात परंतू शरीराकडे दुर्लक्ष करतात. माणव जी उदिष्ट प्राप्त करतो.त्याचा जीवनात आनंद मिळवायचा असेल तर माणसांची शरीरयष्टी व मानसिक आरोग्य चांगले असणे अतिशय महत्वाचे आहे. जीवनाचा आनंद मिळवायचा असेल तर दिनचर्यामध्ये योगाचा समावेशकेला पाहिजे.असे थोरात यांनी सांगितले. मुख्याधिकारी अजित निकत यांनी योग दिनानिमित्त शहरातील नागरीकांना शुभेच्छा देवून योग साधना दिनचार्यामध्ये किती गरजेची आहे. याचे महत्व सांगितले. योगगुरु किशोर थोरात यांनी योगासनाचे विविध प्रकाराचे प्रात्यक्षिक करुन दाखवले.त्या प्रमाणे नागरीक व कामगारांकडून विविध योगासने करुन घेतली. देवळाली प्रवरा जिल्हा परीषद शाळेत योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांना योगाचे धडे देण्यात आले.यावेळी शिक्षक हसन शेख यांनी विविध प्रकारची योगासने प्रात्यक्षिक करुन दाखविले. यावेळी विद्यार्थ्याबरोबर शिक्षकांनी योगसनाचे धडे गिरविले. यावेळी किशोर नवले, भास्कर बुलाखे, एस .ऐ.अंगारखे, हसन शेख, एस.बी.जाधव, ऐ.व्ही.तुपे, सुनिता मुरकुटे, व्ही.डी.तनपुरे, पेरणे,इनामदार, एटाळे,तुपे, पालवे, आंबेकर आदी शिक्षक उपस्थित होते.

COMMENTS