Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चिमठाणे शिवारात बिबट्याचा धुमाकूळ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी

धुळे प्रतिनिधी- चिमठाणे शिवारात तीन ते चार दिवसांपासून बिबट्या हा धुमाकूळ घालत असून चिमठाणे ते निशाणे ह्या शिवारात गहू, हरभरा, ऊस अशा पिकांची मो

दुकानदाराला चप्पलाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार
ठाण्यात कोरोनाची चिंता करण्याची गरज नाही.. 
नायब तहसीलदारासह दोघांवर लाचलुचपतप्रकरणी कारवाई

धुळे प्रतिनिधी- चिमठाणे शिवारात तीन ते चार दिवसांपासून बिबट्या हा धुमाकूळ घालत असून चिमठाणे ते निशाणे ह्या शिवारात गहू, हरभरा, ऊस अशा पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली असून रात्रीच्या वेळी शेतकरी वर्ग हा शेती मध्ये पाणी भरण्यासाठी जात असतो कारण दिवसभर लाईट नसल्याने रात्री लाइट येते त्यामुळे पाणी भरण्या करण्यासाठी सालदार किंवा अनेक शेतकरी पाणी भरत असतात. या वेळी निशाणे रस्त्याच्या कडेला उसाचे शेत असून या ठिकाणी बिबट्या हा अनेक दिवसांपासून आपले वास्तव्य करून असल्याचे निदर्शनास आले आहे.कैलास सिद्धा पावरा हा सालदार मोटारसायकल वर जात असताना त्याला बिबट्या ने पंजा मारून जखमी केले असू काल ह्या व्यक्तीला गहू ला पाणी भरायला जात असताना हाताला व पायाला जखमी केले असून सलग दोन वेळा बिबट्या ने कैलास पावरा वर वार केला त्यामुळे कैलास पावरा हा मोठ्या प्रमाणत जखमी झाला असून त्याच्यावर चिमठाणे प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये देखील उपचार करण्यात आले होते. बिबट्या ने पूर्ण चिमठाणे परिसरात मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला असून त्यामुळे शेतकरी वर्ग नव्हे तर पूर्ण चिमठाणे गावातील नागिरकाना मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागचे अधिकारी काशिनाथ देवरे यांनी देखील याठिकाणी बिबट्या चे ठसे असल्याचे पाहिले असून बिबट्याचे किंवा त्यांच्या मादीचे जे बछडे आहेत यांना पिजऱ्यात बंद कसे करता येईल ह्या साठी देखील वन विभागाचे अधिकारी प्रयत्न करत असून आज शेतामध्ये 4 ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहे. बिबट्या व रानडुक्कर याची देखील अनेक वेळा रात्रीच्या अंधारात लढाई होत असते त्यामुळे नागरिकांना मध्ये मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झाले असून, शेतकऱ्यांना रात्र झाली की शेतात कसे जायचे असे संकट उभे राहिले असून यामुळे चिमठाणे परीसरात वन विभागाने कडक बंदोबस्त करून ज्या ठिकाणी बिबट्या चे ठसे आढळले असून किंवा ज्या शेतात बिबट्या चे वास्तव्य असून अश्या ठिकाणी लक्ष देऊन ह्या बिबट्या चा ताबडतोब बंदोबस्त करावा व पिजऱ्यात बंद करावे अशी मागणी चिमठाणे परीसर मध्ये शेतकरीनी केली आहे

COMMENTS