जगाची लोकसंख्या 48 वर्षात दुप्पट

Homeताज्या बातम्यादेश

जगाची लोकसंख्या 48 वर्षात दुप्पट

पृथ्वीवर तब्बल 8 अब्ज माणसांचे वास्तव्य

नवी दिल्ली : लोकसंख्या वाढीचा विस्फोट होत असून, लोकसंख्या वाढीचा वेग कमालीचा वाढल्यामुळे भविष्यात अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता

खेड बुद्रुक येथे कोविड 19 लसीकरणाचा शुभारंभ
खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी
आभासी चलनावरील अंकुश

नवी दिल्ली : लोकसंख्या वाढीचा विस्फोट होत असून, लोकसंख्या वाढीचा वेग कमालीचा वाढल्यामुळे भविष्यात अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. संपूर्ण जगाची लोकसंख्या 8 अब्जावर पोहचली आहे. मानवांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने भविष्यात अन्न-धान्य तसेच अनेक गरजेच्या वस्तूंचा तुटवडा भासणार आहे. काही तज्ज्ञांच्या मते काही वर्षांनी अशी स्थिती निर्माण होईल, ज्यामुळे लोकसंख्या वाढीचा वेग मंदावून तो स्थिर राहील. कालांतराने हा दर खाली देखील येईल. मात्र, गेल्या 48 वर्षात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या ही दुपटीने वाढली आहे. जगाची लोकसंख्या ही 1974 मध्ये 4 अब्ज एवढी होती. मात्र, हा आकडा आता 8 अब्ज झाला आहे. 1950 मध्ये जगाची लोकसंख्या ही केवळ अडीच अब्ज एवढी होती. 2086 मध्ये जगाची लोकसंख्या ही 10.6 अब्ज एवढी होणार आहे.
वाढत्या लोकसंखेची आकडेवारी पाहिल्यास, सर्वाधिक जास्त लोकसंख्या ही चीनची आहे. तब्बल 142 कोटी नागरिक चीनमध्ये आहेत. यानंतर दूसरा क्रमांक हा भारताचा येतो. भारताची लोकसंख्या ही तब्बल 141 कोटी आहे. ज्या वेगाने भारताची लोकसंख्या वाढत आहे, त्या हिशोबाने 2023 मध्ये भारत चीनला लोकसंखेच्या बाबतीत मागे टाकणार असल्याचे एंकदरित चित्र आहे. 2050 पर्यन्त लोकसंख्या वाढीचा वेग हा स्थिर होईल. या नंतर हा वेग कमी होण्याची शक्यता आहे. हेच कारण आहे की भारत आणि चीन सारखे अनेक देशांच्या तरुण मुलांची संख्या देखील कमी होणार आहे. याचा परिणाम देशाच्या वर्कफोर्स वर होणार आहे. जगातील अनेक देशांचा लोकसंख्या वाढीचा दर हा 2.1 टक्क्याने कमी झाला आहे. असे बोलल्या जात आहे की, जगाचा लोकसंख्या वाढीचा दर हा 2055 पर्यन्त 2.1 एवढा राहणार आहे. संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार लोकसंख्येत सर्वाधिक वाढ ही 2012 ते 2014 दरम्यान झाली. या कालावधीत 14 कोटी मुलांचा जन्म झाला. लोकसंख्यावाढीचा दर हा 2041 पर्यन्त खाली येऊ शकतो. मात्र, सध्या लोकसंख्या वाढ ही वेगाने झाली झाली आहे. लोकसंखेत पुढील 12 वर्षात 1 अब्जने वाढ होणार आहे. लोकसंख्यावाढी संदर्भात माहिती असणारे तज्ञ व्यक्तिचे म्हणणे आहे की, मृत्यु दरात झालेल्या घटीमुळे लोकसंख्या वाढली आहे. गेल्या 70 वर्षात जगाची लोकसंख्या वाढीत चीन आणि भारताची मोठी भूमिका राहिली आहे. दोन्ही देशांची लोकसंख्या एकत्र केल्यास दोन्ही देशात तब्बल 2.80 अब्ज नागरिक राहतात. मात्र, येत्या काळात भारत आणि चीनच्या लोकसंख्या वाढीचा दर हा कमी होणार आहे. 21 व्या शतकाच्या शेवटच्या दशकात भारत आणि चीन पेक्षा अफ्रीकी देशात लोकसंख्या वाढीचा वेग हा सर्वाधिक राहणार आहे. यात टांझानिया, नायजेरीया आणि कॉन्गो या देशांचा समावेश आहे.

COMMENTS