Homeताज्या बातम्याक्रीडा

जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा : सलग दुसर्‍या दिवशी भारतीयांकडून निराशा

बुडापेस्ट (हंगेरी) : भारतीय खेळाडूंनी जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सलग दुसर्‍या दिवशी निराशा केली. संतोष कुमार तमिलार्नसन 400 मीटर अडथळा

रोनाल्डोला मिळाला नवा संघ
ओम कदम याला बॉक्सिंगमध्ये सुवर्ण पदक
मीराबाई चानूची रौप्यपदकाची कमाई

बुडापेस्ट (हंगेरी) : भारतीय खेळाडूंनी जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सलग दुसर्‍या दिवशी निराशा केली. संतोष कुमार तमिलार्नसन 400 मीटर अडथळा शर्यत, तर सर्वेश कुशारे उंच उडी प्रकारात रविवारी पात्रता फेरीचाही अडथळा पार करू शकले नाहीत.
तमिलार्नसन 400 मीटर अडथळा शर्यतीत पात्रतेच्या तिसर्‍या हिटमधून सहभागी झाला होता. तमिलार्नसनने 50.46 सेकंद अशी वेळ दिली आणि त्याला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. चार हिटमधील पहिल्या क्रमांकाचे खेळाडू आणि त्यानंतर सर्वोत्तम वेळ देणारे चार खेळाडू उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत चांगली कामगिरी करणार्‍या सर्वेशला उंच उडीत तीन प्रयत्नांनंतरही 2.25 मीटरचे आव्हान पार करता आले नाही. पात्रता फेरीच्या ब-गटात सर्वेश 11व्या, तर एकुणात 20व्या स्थानावर आला. पात्रता फेरीत 2.30 मीटर उडी मारणारे किंवा किमान सर्वोत्तम कामगिरी करणारे 12 खेळाडू अंतिम फेरीत पोहोचले. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पुरुषांच्या 20 किमी चालण्याच्या शर्यतीमधील तीन भारतीय, तीन हजार स्टीपलचेस शर्यतीत अविनाश साबळे, महिला लांब उडीतून शैली सिंह, तिहेरी उडीतील प्रवीण चित्रावेल, एल्डोस पॉल, अब्दुला अबूबकर यापैकी एकही खेळाडू अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही.

COMMENTS