शब्द बंदी तरीही खडाजंगी !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

शब्द बंदी तरीही खडाजंगी !

   भारताच्या संसदीय इतिहासात प्रथमच भाषेतील शब्द बंदी आणली जात असल्याची माहिती, आता समोर आली आहे. भाषा ही काय ताकद असणारी बाब आहे, हे यावरून स्पष्ट ह

आहारावर वाद करणाऱ्यांचे मनसुबे काय !
चौकशी समितीची शिफारस, सेबी’ने करावी चौकशी !
महाराष्ट्र भयमुक्त रहावा !

   भारताच्या संसदीय इतिहासात प्रथमच भाषेतील शब्द बंदी आणली जात असल्याची माहिती, आता समोर आली आहे. भाषा ही काय ताकद असणारी बाब आहे, हे यावरून स्पष्ट होत आहे. दांभिक, भ्रष्ट, विश्वासघाती, जुमलाजीवी, बालबुध्दी, कोविड स्प्रिडर, आणि स्नूपगेट आदी शब्द आता असंसदीय ठरविण्यात आले असून या शब्दांना संसंदेत म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही ठिकाणी वापरता येणार नाही. अर्थात, या शब्दांचा वापर आतापर्यंत देशात सर्रास करण्यात येत होता. मात्र, यातील जुमलाजीवी, कोविड स्प्रिडर हे दोन शब्द भाषिक शब्दावली मध्ये या दोन शब्दांची नव्याने भर पडली आहे. यापूर्वी जुमला हा शब्द भाषिक होता पण जुमलाजीवी या शब्दाची निर्मिती ही भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनावर बोलताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाष्यावरून आली. दिल्लीच्या बाॅर्डरवर न‌ऊ महिने चाललेल्मा शेतकरी आंदोलनाला पंतप्रधानांनी ‘आंदोलनजीवी’, हा शब्द वापरला होता. या शब्दावर देश-विदेशातून टिकेची झोड उठली होती. या शब्दाला प्रत्युत्तर म्हणून आंदोलकांनी थेट जुमलाजीवी या शब्दाला जन्म दिला. कोविड काळात अचानक लावलेला लाॅकडाऊन आणि त्यातून देशभरातील विस्थापित मजूर आपापल्या गावी जाण्यासाठी रस्त्याने पायपीट करायला उतरले. हजार, दीड हजार किमी. पायपीट करणारे मजूर लाखोंच्या संख्येने निघाले होते. साहजिकच, कोरोना काळात एवढे लोक एकाचवेळी एकमेकांच्या संपर्कात आल्याने कोरोनाचे इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक होता. कोरोना पसरण्याचे खरे कारण लोकांचा समुह कोणत्याही स्वरूपात एकत्र येणं यातून संसर्ग वाढण्याचा धोका होता, यातूनच या अवस्थेला कोविड स्प्रिडची अवस्था म्हणून संबोधण्यात आले. या अवस्थेला निर्माण करण्यास कारणीभूत ठरणाऱ्यांना कोविड स्प्रिडर म्हटले गेले. कोरोना काळात भाषेच्या अनेक संकल्पना जन्माला आल्या. तरीही, एवढ्या कमी काळात या भाषिक संकल्पना वापरण्यावर बंदी घालण्यात येत आहे. त्यामुळे, असं काय झालं की, इतक्या तात्काळ या शब्दांच्या वापरावर बंदी घालण्यात येत आहे, हा प्रश्न उभा राहतो. यासाठी आपल्याला आस्ट्रेलियन आदिवासींच्या बुमरॅंग या साधनाला समजून घ्यावे लागेल. बुमरॅंग हा शब्द म्हणजे आदिवासी समुदायाचे शिकार करण्याचे एक साधन असते. हे साधन कुठेही फेकले तरी ते फेकणाऱ्या शिकाऱ्याकडेच वेगाने परत येतं. सध्या बंदी घालण्यात येत असलेल्या शब्दांचा प्रकार काहीसा असाच होतो. कोरोना काळ हा सर्व जगात एक भयावह काळ म्हणून ओळखला जात आहे. यात भल्याभल्या राज्यकर्त्यांना अंदाज येत नव्हता. त्यामुळे, जगातल्या प्रत्येक देशातील सत्ता प्रमुखाने वेगवेगळ्या प्रकारचे हातखंडे वापरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आपल्या सल्लागारांच्या मदतीने अनेक निर्णय घेतले. कोरोनाचे संकट पूर्णपणे नवीन असल्याने या काळात अनेक सत्ताधाऱ्यांचे अंदाज चुकले. त्यात मोदींचेही अंदाज मागेपुढे झाले असतीलही; परंतु, एक मान्य करायला हवे की, आज जगभरात कोरोना पुन्हा थैमान घालत असताना भारतात तो पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. याचे प्रमुख कारण मोदींनी मोठ्या प्रमाणात लसीकरण घडवून आणण्यात मिळवलेले यश. सध्या कोरोनाचे काही सब व्हेरियंट देशभरात आढळत असले तरी, रूग्ण हाॅस्पीटलाईज करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. असो. तर संसदीय कामकाजात आता वरिल शब्द केवळ वगळण्यातच येणार नाहीत, तर त्या शब्दांचा वापर करण्यास बंदी करण्यातून फार काही साध्य होणार नाही. कारण संसंदेत महागाई, बेरोजगारी, पेट्रोलियम पदार्थांची महागाई आदि प्रश्नांवर संसंदेत खडाजंगी होणार आहे. त्यामुळे या शब्द संकल्पनावर बंदी आणली गेली तरी संसंदेत होणारी खडाजंगी थांबवता येणार नाही, हेच खरे!

COMMENTS