Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ग्रामीण भागात महिलांच्या आरोग्याचे प्रश्‍न गंभीर -डॉ. शिल्पा पाठक

निमगाव वाघा येथे महिलांची मोफत आरोग्य तपासणी शिबिराला महिला उत्स्फूर्त प्रतिसाद

अहमदनगर (प्रतिनिधी)- कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना महिलांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे. ग्रामीण भागातील महिलांमध्ये आरोग्याप्रती जागरुती नसल्याने अने

कोल्हापूर ते दिल्ली गाजवणारे Pt. नारायणराव व्यास | Kolhapur | LokNews24
जामखेड येथील 13 विद्यार्थ्यांची निवड
नवरात्रोत्सवानिमित्त समता स्कूच्या सांस्कृतिक कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

अहमदनगर (प्रतिनिधी)- कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना महिलांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे. ग्रामीण भागातील महिलांमध्ये आरोग्याप्रती जागरुती नसल्याने अनेक गंभीर आजारांना त्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे प्रतिपादन स्त्री रोग तज्ञ डॉ. शिल्पा पाठक यांनी केले.
निमगाव वाघा (ता. नगर) येथे साई स्पर्श मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल, एकता फाऊंडेशन व निमगाव वाघा ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ. पाठक महिलांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे माजी संचालक संपतराव म्हस्के, माजी अध्यक्ष रा.वी. शिंदे, जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, माजी जिल्हा परिषद सदस्या कालिंदीताई लामखेडे, पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर, विजय जाधव, डॉ. राकेश थोरात, हॉस्पिटलचे डॉ. अमोल जाडकर, डॉ. संतोष राहिंज, विरेंद्र लोखंडे, सागर ढगे, राम आढाव, एकता फाउंडेशनचे अध्यक्ष अतुल फलके, ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, अनिल डोंगरे, गोकुळ जाधव, अण्णा जाधव, पिंटू जाधव, सुभाष जाधव, सोमनाथ फलके आदी उपस्थित होते.
माधवराव लामखडे म्हणाले की, उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती असून, आरोग्य चांगले राहण्यासाठी व्यायाम व सकस आहाराकडे वळण्याची गरज बनली आहे. तर वेळोवेळी आरोग्य तपासणी करुन गंभीर आजारांचे धोके टाळता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. शिल्पा पाठक यांनी महिलांची आरोग्य तपासणी करुन महिलांच्या मासिक पाळी, ओटी-पोट दुखणे, अंगावर पांढरे जाणे, पूर्व प्रसूती पश्‍चात तपासणी, वंध्यत्व निवारण अशा अनेक आरोग्य विषयावर महिलांना मार्गदर्शन केले. या शिबिराला निमगाव वाघा येथील पंचक्रोशीतील महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.

COMMENTS