Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भांबोऱ्यात शाळा बंदचा पालकांकडून निषेध 

कर्जत प्रतिनिधी / जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्यातील सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे अनेक सरकारी कार्यालयाचे

त्या इंजेक्शनचा काळाबाजार रोखा
महाराष्ट्रातील ठाकरे सरकार हिंदूद्रोही : आ. राणेंची टीका
केडगावमध्ये भरदिवसा तीन तोळ्याचे दागिने लांबविले

कर्जत प्रतिनिधी / जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्यातील सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे अनेक सरकारी कार्यालयाचे कामकाज ठप्प पडल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. या संपात सर्व शिक्षक सहभागी झाल्याने शाळा बंद आहेत. त्यामुळे मुलांचे शिक्षण थांबले आहे. त्यामुळे पालकांकडून विविध माध्यमातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 

या विषयावर कर्जत तालुक्यातील भांबोरा येथील पालकांची बैठक झाली. शिक्षकांनी आपल्या मागण्यांसाठी शाळा बंद ठेवल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या मुद्द्यावर पालक व ग्रामस्थांनी भांबोरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जाऊन निषेध नोंदवला. शासनाने मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने कठोर पावले उचलण्याची मागणी करत पालकांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, सेवा संस्थेचे चेअरमन, संचालक, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

आमचा पेन्शनसाठी विरोध नाही परंतु या मागणीसाठी शाळा बेमुदत बंद ठेवण्याला आमचा विरोध आहे. यासाठी शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन तातडीने शाळा सुरू  कराव्यात. ऐन परिक्षेच्या तोंडावर संप झाल्याने पालकांमध्ये संतापाची भावना आहे. आंदोलनाचे इतरही मार्ग आहेत. शाळा बंद हा यावर उपाय नाही, अशी प्रतिक्रिया शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष औदुंबर जगताप यांनी दिली.

शाळा व्यवस्थापनचे माजी अध्यक्ष शरद लोंढे म्हणाले, कोरोना काळात २ वर्षे शाळा बंद असल्याने मुलांना अनेक प्राथमिक गोष्टी येत नाहीत. आता कुठे सुरळीतपणा आला होता. मुलही आनंदी शिक्षण घेत होते. या अचानक सुरु झालेल्या बेमुदत संपामुळे मुलांचे मानसिक खच्चीकरण होऊ शकते. याचा विचार करून संपकरी शिक्षकांनी तातडीने शाळा सुरू कराव्यात.

COMMENTS