Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धनश्री शेतकरी मंडळाच्या मागण्यांची पूर्तता करू- डॉ.सचिन सानप

शिरूर प्रतिनिधी - मौ.हिवरसिंगा ग्रां.पं कार्यालय येथे वृक्षलागवड व शेतकरी संवाद कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.या . कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी

बाबासाहेब भोस यांची शरद पवार गटात घरवापसीचे संकेत
दुसऱ्या कसोटीत भारताचा शानदार विजय
वंचितचा काँगे्रसला 7 दिवसांचा अल्टीमेटम

शिरूर प्रतिनिधी – मौ.हिवरसिंगा ग्रां.पं कार्यालय येथे वृक्षलागवड व शेतकरी संवाद कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.या . कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री.सचिनजी सानप (गटविकास अधिकारी पंचायत समिती शिरूर) ,श्री.डि.एस. मिसाळ (प्रशासक ग्रा.प. हिवरसिंगा) श्री.अशोकराव मिसाळ (ग्रामविकास अधिकारी), श्री.शिवराम राऊत(अध्यक्ष -धनश्री शेतकरी मंडळ ) श्री .अशोक शिंदे (पत्रकार) गौतम औसरमल (पत्रकार) यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत अंतर्गत वृक्षारोपण व शेतकरी संवाद कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री.अशोकराव मिसाळ यांनी केले.यावेळी धनश्री शेतकरी मंडळ हिवरसिंगा यांच्या वतीने पं.स.शिरूर अंतर्गत शेतकरी विकासाच्या योजना ची माहिती देऊन त्या शेतकरी हिताच्या योजना राबविण्यात याव्यात यासाठी अध्यक्ष श्री.शिवराम राऊत, श्री.नवनाथ बडे, यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.यामध्ये प्रामुख्याने हिवरसिंगा नदीवरील 3 ठिकाणी पुल बांधकाम करणे, हिवरसिंगा नदी ते कुटे-बडे वस्ती पर्यंत चां शेतरस्ता दुरूस्ती करणे, वैयक्तिक लाभ जलसिंचन विहीर लाभ देणे,शेततलाव,फळबाग लागवड,कुटे-बडे वस्ती चां वंसतराव नाईक वस्ती सुधार योजना आराखड्यात समावेश करण्यात यावा त्या ठिकाणी विविध विकासकामांचे प्रस्ताव करावे, मौ.हिवरसिंगा येथे सामुदायिक स्मशानभूमीची उभारणी, शेतमाल साठवण गोदाम उभारणी, लक्ष्मीआई मंदिर ते कॅनाल रोड पर्यंत शेतरस्ता दुरूस्ती करणे, हिवरसिंगा जि.प.शाळेमध्ये महिला स्वच्छतागृहाची बांधकाम करणे,जि.प.प्रा.शाळेच्या आवारातील गावपाणीपूरवठा योजनेचा जलकुंभाच्या खालच्या बाजूचे प्लास्टर निखळून पडत आहे.त्याची दुरुस्ती करणे अशा शेतकरी, विद्यार्थी व लोकहिताच्या पंचायत समिती अंतर्गत कामे पुर्ण करण्यासाठी . दिलेल्या निवेदनातील लोकविकासाचे सर्व कामे त्या संदर्भात प्रस्ताव तयार करून मंजूरी साठी सहाय्य करण्यात येईल असे आश्वासन गटविकास अधिकारी यांनी दिले.यावेळी श्री.भिमराव सानप, श्री.जालिंदर दूधाळ, साहेबराव राऊत.गोवर्धन गरत , श्री.हनुमान शिंदे, श्री.मकिंद दुधाळ, श्री.सतिष दुधाळ, मच्छिंद्र सालपे, श्री.वैजिनाथ सानप,तसेच ग्रा.प.कर्मचारी सौ.अंजली बडे,श्री.लखन हतागळे, श्री.महादेव देवकर, श्री.विठठल दुधाळ, श्री.मधुकर बडे , धनश्री शेतकरी मंडळाचे सभासद शेतकरी , ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.अशोक शिंदे तर आभार प्रदर्शन महादेव देवकर यांनी केले.

COMMENTS