Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिकारीसाठी विनापरवाना प्रवेश; संशयितांकडून घोरपडीवर अत्याचार; अत्याचाराचा व्हिडीओ पाहून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी चक्रावले

वन्यप्राण्यासोबत संभोग करणे ही फारच विचित्र घटना आहे. ही घटना मांडताना सर्व कायदेशीर बाजू न्यायालयासमोर सादर केल्या जातील. यासाठी कायदेतज्ज्ञांची

महाबळेश्‍वर गारठले; पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण
राज्यात उद्यापासून तीन दिवस पावसाचा जोर
राहुरीमध्ये हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ


वन्यप्राण्यासोबत संभोग करणे ही फारच विचित्र घटना आहे. ही घटना मांडताना सर्व कायदेशीर बाजू न्यायालयासमोर सादर केल्या जातील. यासाठी कायदेतज्ज्ञांची मदत घेतली जाईल.
विशाल माळी, (विभागीय वनाधिकारी, चांदोली राष्ट्रीय उद्यान)

शिराळा / प्रतिनिधी : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात गोठणे येथील गाभा क्षेत्रात शस्त्रास्त्रांसह फिरणार्‍या संदीप तुकाराम पवार (हातीव गोठणे), मंगेश जनार्धन कामतेकर, अक्षय सुनील कामतेकर (गुरववाडी, ता. संगमेश्‍वर) या तीन शिकार्‍यांना वन्यजीवच्या अधिकार्‍यांनी अटक केली आहे. हे तिन्ही शिकारी नजीकच्या भागांतील गावकरी आहेत. मात्र, चौकशीअंती या तीन आरोपी पैकी एका आरोपीने चक्क घोरपडीवर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती तपास करणार्‍या वनाधिकार्‍यांना मिळाली आहे.
घोरपडी सारख्या साडेचार फूटांच्या प्राण्यासोबत संभोग करण्याचे घृणास्पद कृत्य करणार्‍याला आता वनविभाग मानसोपचार तज्ज्ञांच्या हवाली करण्याची तयारी करत आहे. ही घटना वन गुन्ह्यातील अत्यंत दुर्मिळ घटना मानली जात आहे.
व्याघ्र गणनेसाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात लावलेल्या कॅमेर्‍यात 31 मार्च रोजी शस्त्रांस्त्रासह तीन आरोपी जंगलात जात असल्याचे वनरक्षकांनी पाहिले. त्याने गुन्हा दाखल करून वरिष्ठ अधिकार्‍यांना कल्पना दिली. वरिष्ठ अधिकार्‍यांनी तपास करून तिघा आरोपींना ताब्यात घेतले. एक आरोपी हातिव गावातून तर दोन आरोपींना रत्नागिरीतील संगमेश्‍वर तालुक्यातील मारळ येथून ताब्यात घेण्यात आले. या आरोपींचे मोबाईलही वन अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले.
या तिन्ही आरोपींचे मोबाईल तपासल्यानंतर एका आरोपीने चक्क घोरपडी सोबतच संभोग केल्याचा चित्रीत व्हिडिओ वनाधिकार्‍यांच्या हाती लागला. संभोग करताना आरोपीच्या मोबाईलमधून त्याचे चित्रीकरण केले जात होते. ती घोरपड या घृणास्पद कृत्यानंतर जिवंत राहिली का?, आरोपीने इतर अन्य वन्यप्राण्यासोबत संभोग केला आहे का?, याबाबतची चौकशी सुरु असल्याची माहिती चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे विभागीय वनाधिकारी विशाल माळी यांनी दिली. या तिन्ही शिकार्‍यांना मिळालेली वनकोठडी 7 एप्रिल रोजी संपत आहे. परंतू चौकशीसाठी अजूनही वाव असल्याने वनाधिकार्‍यांची टीम हा मुद्दा न्यायालयासमोर मांडणार आहे

COMMENTS