Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाट पाहीन पण एसटीनेच जाईन; महिलांची एसटीला पसंती

अंबाजोगाई प्रतिनिधी - राज्य शासनाने राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसचे तिकीट महिलांसाठी अर्धे केल्याने सर्वच महिलांचा कल एसटीे प्रवास करण्याकडे

मालेगावमध्ये महापालिकेत काँगे्रसला खिंडार ; काँगे्रसच्या महापौरांसह 28 नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये प्रवेश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची घेतली भेट 
महसूल प्रशासनाकडून डिजीटल सात बाराचे घरपोच वाटप

अंबाजोगाई प्रतिनिधी – राज्य शासनाने राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसचे तिकीट महिलांसाठी अर्धे केल्याने सर्वच महिलांचा कल एसटीे प्रवास करण्याकडे झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील गावखेड्यामध्ये सेवा देणार्या रिक्षा चालक-मालकांचा धंदा कमी झालेला आहे.
जिल्ह्यातील गावखेड्यांतील ग्रामस्थ कामानिमित्त व बाजार करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी येत-जात असतात. एसटीच्या गाड्यांच्या कमी व नियोजित वेळेतील फेर्यांमुळे अनेकजण रिक्षाला पसंती देत होते. मात्र, एसटीचे तिकीट महिलांसाठी अर्धे झाल्याने सध्या हे चित्र बदलले आहे. कारण, बहुतांश महिला ‘वाट पाहीन पण एसटीनेच जाईन’ या एसटीच्या ब्रीदवाक्यप्रमाणे वागताना दिसत आहेत. बस स्थानकात एसटीची वाट पाहत महिला दिसतात. एसटीनेच प्रवास करतात. यामुळे रिक्षा चालक-मालकांचा धंदा कमी झाला आहे. अगोदरच कोविडमुळे नुकसान सोसावे लागले होते आणि आता पुन्हा प्रवासी मिळत नसल्याने नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. स्वतः मुख्यमंत्री रिक्षा चालक होते. त्यामुळे त्यांनी रिक्षा चालकांची व्यथा माहिती असणार एसटीचे अर्धे तिकीट झाल्याने सध्या महिला रिक्षामध्ये बसत नाहीत. त्यामुळे नुकसान सहन करावे लागते. दिवसभर प्रवाशांची वाट पाहात थांबावे लागते. अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे.

COMMENTS