Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे 10 जूनला प्रस्थान

पुणे : पंढरपूरच्या आषाढवारीसाठी देहू संस्थानने संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे वेळापत्रक जाहीर केले. आगामी 29 जून रोजी असलेल्या आषाढी एकादशीसाठी

कांदा रस्त्यावर ओतून शेतकर्‍यांचा संताप
कॉ. कातोरेंवरील हल्ल्याच्या प्रतिकाराबद्दल माकपच्या कार्यकर्त्यांचे कौतुक : डॉ. अशोक ढवळे
मोहा ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात

पुणे : पंढरपूरच्या आषाढवारीसाठी देहू संस्थानने संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे वेळापत्रक जाहीर केले. आगामी 29 जून रोजी असलेल्या आषाढी एकादशीसाठी संतश्रेष्ठ तुकोबारायांची पालखी देहू येथून 10 जून रोजी प्रस्थान करणार आहे.
यंदाचे पालखी सोहळ्याचे 338 वे वर्ष असून तुकारामांच्या पालखीचे देहू येथून 10 रोजी प्रस्थान होईल. तर 28 जून रोजी पालखी पंढरपुरात दाखल होईल. हा 19 दिवसांचा पालखी प्रवास असणार आहे. आगामी  10 जून रोजी दुपारी 2 तारखेला पालखीचं प्रस्थान होईल. पहिला मुक्काम इनामदार वाडा येथे होणार आहे. 11 जून रोजी आकुर्डी, 12 जून रोजी नानारपेठ, 13 जून रोजी नानारपेठ निवडुंगा विठ्ठल मंदिरत दिवसभर दर्शन असेल. त्यानंतर बुधवार, 14 जून रोजी लोणीकाळभोर, 15 जून यवत, 16 जून वरवंड, 17 जून रोजी उंडवडी गवळ्याची, 18 जून बारामती, 19 जून रोजी सणसर, 20 जून रोजी आंथुर्णे येथे पहिले गोल रिंगण होईल व मुक्काम करेल. त्यानंतर 21 जून निमगाव केतकी, 22 जून इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण व मुक्काम, 23 जून रोजी सराटी, 24 जून रोजी निरा स्नान व तिसरे गोल रिंगण आणि अकलूज येथे पालखीचा मुक्काम असेल. त्यानंतर 25 जून रोजी माळीनगर येथे पहिले उभे रिंगण होईल तर रात्री बोरगाव येथे पालखी मुक्काम होईल. 26 जून रोजी सकाळी धावा रात्री पालखी मुक्का पिराची कुरोली येथे होणार आहे. 27 जून रोजी बाजीराव विहिर येथे उभे रिंगण व वाखरी येथे मुक्काम. आगामी 28 जून रोजी वाखरीवरुन पालखी पंढरपुरात दाखल होईल. दुपारी उभे रिंगण व त्यानंतर पंढरपुरातील संत तुकाराम महाराज मंदिर येथे पालखी सोहळा होईल. बुधवार, दि 29 जून रोजी तुकाराम महाराज संस्थान मंदिर येथे पालखी मुक्कामी असेल. 29 जून ते 3 जुलै रोजी दुपारपर्यंत पालखी सोहळा मुक्काम प्रदक्षिणा मार्गावरील संत तुकाराम महारज संस्थानच्या नवीन इमारतीमध्ये असेल. नंतर परतीचा प्रवास सुरु होईल. 13 जुलै रोजी पालखी देहू येथे परतणार आहे.

COMMENTS